सांगोल्याजवळ मोटारसायकल - ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात; तीन ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 19:57 IST2021-02-27T19:55:33+5:302021-02-27T19:57:57+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

सांगोल्याजवळ मोटारसायकल - ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात; तीन ठार, दोघे जखमी
सांगोला - पंढरपूर-कराड रोडवरील चिकमहूद पाटीजवळ झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघांवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मोटारसायकल व ट्रॅक्टर अशा तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातातील मयत हे देवापूर (ता. म्हसवड) व पंढरपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. अन्य दोन जखमी हे पंढरपूर तालुक्यातील आहेत.