जामगावच्या संपर्कातील तिघांना 'कोरोना' ची लागण; उक्कडगावात ही आढळला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 08:49 IST2020-06-04T08:22:31+5:302020-06-04T08:49:23+5:30

बार्शी तालुका आरोग्य विभाग अलर्ट; शहरातील वाणी प्लॉट परिसरातील नागरिकांची तपासणी

Three people in contact with Jamgaon contracted 'corona'; The patient was also found in Ukkadgaon | जामगावच्या संपर्कातील तिघांना 'कोरोना' ची लागण; उक्कडगावात ही आढळला रुग्ण

जामगावच्या संपर्कातील तिघांना 'कोरोना' ची लागण; उक्कडगावात ही आढळला रुग्ण

ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

बार्शी : बार्शी येथे सध्या नऊ पॉझिटिव्ह रुग्णावर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.  तर अद्याप १९  जणांचे अहवाल प्रलंबित  होते. आज गुरुवारी सकाळी  १९ प्रलंबित अहवालापैकी आठ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये आज सकाळी तीन पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाले आहेत.


यात जामगावचे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असलेला बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात राहणारा एक पेंटर आणि उर्वरित दोघे हे जामगावचे आहेत. उक्कडगावातही  एक रुग्ण आढळला  आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली. शेंद्री एक निगेटिव्ह, तावरवाडी एक निगेटिव्ह, वैराग एक निगेटिव्ह, अहवाल प्राप्त झाले आहेत.

सोलापूर आजचा अहवाल
 दि.04/06/20 सकाळी 8.00 
आजचे तपासणी अहवाल - 261
पॉझिटिव्ह- 55                                                        (पु.  38 * स्त्री-17  )
निगेटिव्ह- 206
आजची मृत संख्या- 0  
एकूण पॉझिटिव्ह- 1135
एकूण निगेटिव्ह - 6986
एकुण चाचणी- 8121
एकूण मृत्यू- 94
एकूण बरे रूग्ण- 469

 

१९ प्रलंबित पैकी ८ अहवाल प्राप्त

 

जामगाव दोन पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह,

 

बार्शी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह

 

शेंद्री एक निगेटिव्ह,

 

तावरवाडी एक निगेटिव्ह,

 

वैराग एक निगेटिव्ह

Web Title: Three people in contact with Jamgaon contracted 'corona'; The patient was also found in Ukkadgaon