ST bus - Jeep face-to-face collision; Four people died on the spot | एसटी बस - जीपची समोरासमोर धडक; पाच जण ठार, सहा जण जखमी

एसटी बस - जीपची समोरासमोर धडक; पाच जण ठार, सहा जण जखमी

ठळक मुद्दे- सोलापूर-बार्शी रोडवरील राळेरास गावाजवळील घटना- अपघातात बार्शी पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी जखमी- भरधाव वेगात निघालेल्या क्रुझरने दिली एसटीला जोराची धडक

सोलापूर : सोलापूर-बार्शी रोडवरील शेळगांव-राळेरास दरम्यान एसटी बस व क्रुझर जीपची समारोसमोर धडक झाली़ या धडकेत चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली. याच अपघातात पाच जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी ३७७५ ही सोलापूरहुन बार्शीकडे जात असता बार्शीहुन सोलापूरकडे येत असलेली क्रुझर जीप (एमएच १३ सीएस ६२३१) या भरधाव वेगात निघालेल्या जीपने एसटीला जोराची धडक दिली. या धडकेत चार जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात बार्शी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.

अपघातातील मृतांची अशी आहेत नावे.....

1) छगन लिंबाजी काळे वय ३४, रा.पानगाव

2) संदिप पांडूरंग घावटे वय -२३ , रा. पांढरी 

3) देवनारायण महादेव काशीदवय ४४, रा. कव्हे 

4) संभाजी जनार्दन महिंगडे वय. 49 रा. बार्शी

5) राकेश अरुण मोहरे वय 32, रा. बार्शी

अपघातातील गंभीर जखमींची अशी आहेत नावे

1) शुभांगी बांडवे वय 35 रा. बार्शी

2) वर्षा रामचंद्र आखाडे वय 35 रा. बार्शी

3) नीलकंठ उत्तरेश्वर कदम वय 34 रा. पांगरी

4) कविता भगवान चव्हाण  वय 31, रा. अलीपुर

5) नरसिंह महादेव मांजरे, वय 55, रा. देगाव

6) रागिणी दिलीप मोरे, वय 29, रा. बार्शी
 

Web Title: ST bus - Jeep face-to-face collision; Four people died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.