तीन माजी महापौरांचे पक्षांतर, चौथे प्रतीक्षेत, यू. एन. बेरिया, नलिनी चंदेले, अलका राठोड यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:15 IST2025-12-28T11:14:33+5:302025-12-28T11:15:00+5:30
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यालयात दत्तामामा भरणे यांची पत्रकार परिषद सुरू असताना माजी महापौर मनोहर सपाटे दाखल झाले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी भरणे यांच्या कानात काहीतरी कुजबूज केली.

तीन माजी महापौरांचे पक्षांतर, चौथे प्रतीक्षेत, यू. एन. बेरिया, नलिनी चंदेले, अलका राठोड यांचा समावेश
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत माजी महापौर यू, एन. बेरिया, नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष सोडून शनिवारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. माजी महापौर अलका राठोड यांनी काँग्रेस सोडून उद्धवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, माजी महापौर मनोहर सपाटे यांनीही पक्षांतरासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
राष्ट्रवादी (अजित पवार)चे संपर्कमंत्री दत्तामामा भरणे शनिवारी शहर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात बेरिया, चंदेले, माजी नगरसेविका परवीन इनामदार, हारुन शेख यांनी पक्ष प्रवेश केला. बेरिया आणि चंदेले या दोघांनी काँग्रेस पक्ष सोडून शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. बेरिया यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमासाठी शरद पवार मागील महिन्यात सोलापुरात आले होते. त्यात त्यांनी बेरिया यांचे कौतुक केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यालयात दत्तामामा भरणे यांची पत्रकार परिषद सुरू असताना माजी महापौर मनोहर सपाटे दाखल झाले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी भरणे यांच्या कानात काहीतरी कुजबूज केली. त्यानंतर भरणे यांनी संतोष पवार यांच्याकडे पाहून सपाटे यांना पक्षात प्रवेश द्यायचा का, अशी हळूच विचारणा केली. दरम्यान, सपाटे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे काँग्रेस इच्छुकांची मुलाखत घेणाऱ्या राठोड उद्धवसेनेत बेरिया यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमासाठी शरद पवार मागील महिन्यात सोलापुरात आले होते.
काँग्रेस भवनात नुकतेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीवेळी खा. प्रणिती शिंदे यांच्यासोबत दोन दिवस व्यासपीठावर बसून उमेदवारांना प्रश्न विचारणाऱ्या माजी महापौर अलका राठोड यांनी शनिवारी उद्धवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख अजय दासरी, उद्धवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, दत्ता गणेशकर, अजय खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. २०१७ ला मला डावललं गेलं. मी निवडणुकीस उभी राहणार आहे, हे माहिती असतानाही दुसऱ्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये सुरू होता. काँग्रेसमध्ये दुजाभाव केला जातो, असेही राठोड म्हणाल्या. यांच्याशी चर्चा होईल. त्यानंतरच निर्णय करू, असे संतोष पवार यांनी संगितले.