धक्कादायक; शेतातील डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा दुदैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 12:12 IST2020-09-18T12:12:50+5:302020-09-18T12:12:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क

धक्कादायक; शेतातील डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा दुदैवी मृत्यू
कुसळंब : शेतातील डबक्यात पोहण्यास गेलेल्या नऊ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ ही घटना १६ रोजी दुपारनंतर शिरोळे (ता. बार्शी) शिवारात घडली. समाधान नाना कोळी असे त्याचे नाव आहे.
याबाबत सर्जेराव गोरख सुरवसे यांनी पांगरी पोलिसात खबर दिली आहे. दुपारच्या वेळी समाधान हा शेतातील गट नं. १७ मधील डबक्यात पोहून येतो असे आजोबास सांगून गेला होता.
बराच वेळ झाला तरी तो आला नाही. त्याच्या चौकशीसाठी गेले असता त्या डबक्याच्या कडेला लहान मुलाचे कपडे असल्याचे प्रमोद दळवी यांनी पाहिले़ त्यानंतर बालकाचा शोध घेण्यात आला. समाधान डबक्यातील पाण्यात पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे दिसून आले.
याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली असून अधिक तपास पोलीस नाईक मनोज जाधव करत आहेत.