धक्कादायक; अनैतिक संबंध असल्याचा संशय; पतीने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:01 IST2020-06-15T16:56:20+5:302020-06-15T17:01:13+5:30

मोहोळ तालुक्यातील मुंडेवाडी येथील घटना; आरोपीला पोलिसांनी केली अटक

Shocking; Suspected of having an immoral relationship; Husband murdered wife | धक्कादायक; अनैतिक संबंध असल्याचा संशय; पतीने केला पत्नीचा खून

धक्कादायक; अनैतिक संबंध असल्याचा संशय; पतीने केला पत्नीचा खून

ठळक मुद्देमोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथील घटनाअनेतिक संबंध पर्यंत पतीने केला पत्नीचा खूनमोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल, आरोपीला घेतले ताब्यात

मोहोळ : परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यात खोऱ्याचा वार करून निर्घृण खून केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील मुंडेवाडी येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथील गुरुदत्त रामचंद्र चौगुले याची पत्नी गीता गुरुदत्त चौगुले हिने नवऱ्याच्या परस्पर तिच्या ओळखीच्या सुरेश दहिहंडे यास साडेचार लाख रुपये दिले होते. तिच्या व्यवहाराची डायरी नवऱ्याला सापडल्याने त्याचा बायकोवर संशय बळावला, तुझे आणि सुरेश दहिहंडे यांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत. त्यामुळेच तू त्याला पैसे दिले आहेत, यावरून पती आपल्या पत्नीस सातत्याने मारहाण व शिवीगाळ करत होता. याची मध्यस्थी करत सासऱ्याने आठ दिवसापूर्वी एफ. डी मोडून दीड लाख रुपये दिले होते आणि तीन लाख रुपये सुरेश दहिहंडे यांच्याकडून घेऊन देतो, परंतु तुम्ही मुलीस मारहाण व त्रास देऊ नका असे सासर्‍याने सांगितले होते.

त्यानंतर दि.१४ जून रोजी गीता हिने रडत रडत वडिलांना फोन करून सांगितले की दोन दिवसाच्या आत जर राहिलेले तीन लाख रुपये दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, असे नवरा म्हणत असल्याचे फोनवरून वडिलांना सांगितले होते. यावेळीही थोड्या दिवसात तुम्हाला पैशाची जोडणी करून देतो पण माझ्या मुलीला त्रास देऊ नका, असे सासर्‍याने जावयाला विनंती केली होती,

परंतु पैसे मिळाले नाहीत आणि पत्नीच्या अनैतिक संबंधाचे संशयाचे भूत डोक्यात बसल्याने रविवारी १५ जूनच्या संध्याकाळी साडे बारा वाजताच्या सुमारास राहत्या घरी दोघात वाद झाल्याने दोघांत भांडण होऊन श्रीगुरुदत्त चौगुले यांनी पत्नी गीताच्या डोक्यात खोऱ्या चा घाव घालून खून केला असल्याची फिर्याद मुलीचे वडील भास्कर यशवंत जाधव (रा. गंगेवाडी, ता.दक्षिण सोलापूर) यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे.

यानुसार भा.द.वि. कलम ३०२,५०४,५०६ नुसार आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहेत.

घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना या घटनेची माहिती मिळताच आरोपी श्रीगुरुदत्त चौगुले यास तातडीने ताब्यात घेऊन तुरुंगात टाकले आहे.

Web Title: Shocking; Suspected of having an immoral relationship; Husband murdered wife