Sena's bow arrows in Karmali's Nationalist bag! | करमाळ्यातील राष्ट्रवादीचे बागल घेणार हाती सेनेचे धनुष्यबाण !

करमाळ्यातील राष्ट्रवादीचे बागल घेणार हाती सेनेचे धनुष्यबाण !

करमाळा : तेरा वर्ष झाले कुठ पर्यंत सहन करायचे...आता सहनशीलतेचा अंत झालाय,संजयमामांना लोकसभा निवडणुकित पक्षाने आदेश देताच साथ दिली पण आता विधानसभेला पुन्हा संजयमामा उभे राहण्याची तयारी करू लागलेत मग पक्षाचे आता ते ऐकत नाहीत का? सातत्याने आमच्यावर अन्याय होत असल्याने हातात धनुष्यबाण घेणार आहोत असे बागल गटाचे युवा नेते व रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी  रश्मी बागल यांच्या सेना प्रवेशाबद्धल विचारना केली असता स्पष्ट शब्दात सांगितले. 


राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या व युवा नेत्या रश्मी बागल राष्ट्रवादी सोडुन शिवसेनेत प्रवेश करणार असुन सोमवारी सकाळी १० वा. समर्थकांची त्यांच्या करमाळयातील निवासस्थानी बैठक बोलावली आहे.


    राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अंतर्गेत बंडाळी व नियमित हितशत्रूचा विरोध पत्करावा लागत असल्याने बागल गटाचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असुन आगामी विधानसभानिवडणूक राष्ट्रवादी कडून न लढवता शिवसेने कडून लढवावी अशी मागणी होत होती.
-------------------------------
मंत्री सावंत यांचा अशिर्वाद..
येत्या सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर  शिवसेनेत पक्ष प्रवेश होईल असे दिग्विजय यांनी सांगुन शिवसेना जिल्हा  संपर्क नेते व जलसंधारण मंत्री प्रा.तानाजी सावंत यांचा अशिर्वाद असल्याची कबुली देत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्ष उमेदवारी देणार असल्याचा शब्द दिल्याचे  दिग्विजय बागल यांनी सांगितले.

Web Title: Sena's bow arrows in Karmali's Nationalist bag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.