अक्कलकोट तालुक्यात आढळला रानगवा; करजगी- कलहिप्परगा गावातील ग्रामस्थ भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 08:59 IST2021-05-31T08:56:48+5:302021-05-31T08:59:23+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

अक्कलकोट तालुक्यात आढळला रानगवा; करजगी- कलहिप्परगा गावातील ग्रामस्थ भयभीत
अक्कलकोट : करजगी- कलहिप्परगा शेतशिवारात आज सोमवारी सकाळी रानगवा प्राणी आढळला. याबाबत ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला कळविले असता वनविभाग त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. रानगव्याच्या शोधासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. १८३५ साली अक्कलकोट तालुक्यात हा गवाप्राणी आढळुन आल्याचे नागरिकांनी सांगितले.