Maharashtra Election 2019; एकही वाहन नावावर नसलेल्या प्रणिती शिंदे यांची संपत्ती साडेचार कोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 10:59 IST2019-10-04T10:56:44+5:302019-10-04T10:59:09+5:30
शहर मध्य विधानसभा मतदारसंघ; प्रणिती शिंदे यांच्यावर आंदोलनप्रकरणी पाच गुन्हे दाखल

Maharashtra Election 2019; एकही वाहन नावावर नसलेल्या प्रणिती शिंदे यांची संपत्ती साडेचार कोटी !
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला़ आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावावर एकही वाहन नाही तरीही त्यांची संपत्ती साडे चार कोटी रूपयांची आहे.
काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावावर एकही वाहन नाही. चेन, अंगठ्या, बांगड्या असे जवळपास ३०० ग्रॅमचे दागिने असून, त्याचे मूल्य ११ लाख ६१ हजार रुपये आहे. विविध बँक खाती आणि शेअर्समधील गुंतवणुकीचे मूल्य एक कोटी ३९ लाख ६२ हजार आहे. जंगम मालमत्तेचे एकूण मूल्य तीन कोटी ३९ लाख ६४ हजार रुपये आहे. शिंदे यांच्यावर आंदोलनप्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत.