सुधाकरपंतांचा पराभव देशमुखांच्या जिव्हारी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 16:56 IST2019-10-25T16:52:54+5:302019-10-25T16:56:18+5:30
pandharpur Vidhan Sabha Election Results 2019: पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा

सुधाकरपंतांचा पराभव देशमुखांच्या जिव्हारी...!
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात आ. भारत भालके यांनी सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव केला आहे. यानंतर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असल्याने परिचारकांचा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून आले आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील कासेगाव व आजूबाजूच्या गावांमध्ये जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांचा प्रभाव आहे. मात्र आमदारकीच्या निवडणुकीमध्ये या भागातून भालके यांना मताधिक्य मिळाले आहे. परिचारक यांना कमी मते मिळाल्यामुळे, याची जबाबदारी घेत वसंतराव देशमुख यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा सुधाकरपंत परिचारक यांच्या नावे पत्र लिहून दिला आहे. यामध्ये त्यांनी व्यक्तिगत अडचणीमुळे राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.