पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक; पुण्यातील व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 21:26 IST2021-03-18T21:25:48+5:302021-03-18T21:26:20+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक; पुण्यातील व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड पकडली
पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता सध्या सोलापूर जिल्ह्यात लागू झाली आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकास ११ लाख १७ हजार रुपयांची रोकड सापडली आहे.
निवडणूक क्षेत्र असणाऱ्या परिसरात आचारसंहिता लागू असते, अशा परिसरात बेहिशेबी रोख रक्कम घेऊन प्रवास करणे. हे निवडणूक आयोगाच्या नियमास धरून नाही. तालुक्यातील अहिल्या चौकात
येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने पुणे येथील व्यापारी आपल्या वाहनातून ११ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन जाताना आढळला.
सध्या संबंधित इसमाकडे आयोगाकडून तपासणी व चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने सदरची रक्कम ताब्यात घेतली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.