बार्शीतील पॉलिटेक्निक कॉलेजमधील कोरोना विलगीकरण कक्षात एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 11:37 IST2021-04-06T11:35:10+5:302021-04-06T11:37:19+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

One commits suicide in corona isolation room at Barshi Polytechnic College | बार्शीतील पॉलिटेक्निक कॉलेजमधील कोरोना विलगीकरण कक्षात एकाची आत्महत्या

बार्शीतील पॉलिटेक्निक कॉलेजमधील कोरोना विलगीकरण कक्षात एकाची आत्महत्या

बार्शी : बार्शीतील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक कॉलेज येथे असलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

गळफास घेऊन आत्महत्या केलेली व्यक्ती चिखर्डे या गावची असून नाव उमेश भागवत कोंढारे (वय-३७ वर्षे) असे नाव आहे. काही दिवसांपूर्वी कोंढारे आणि त्यांच्या कुटुंबातील आई, पत्नी आणि दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना बार्शीतील पॉलिटेक्निक येथे असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

आज पहाटे फाशी घेतल्याचे तेथील कर्मचा-यांच्या समोर आले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात कळविले. दरम्यान अद्याप फाशी कशामुळे घेतली त्याचे नेमके कारण समोर आलेले नाही, मात्र कोरोना या आजाराला कंटाळूनच कोंढारे यांनी फाशी घेतल्याचे बोलले जात आहे.

Web Title: One commits suicide in corona isolation room at Barshi Polytechnic College