राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना कोरोनाची लागण; पुण्यात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 14:33 IST2020-08-25T14:33:37+5:302020-08-25T14:33:44+5:30
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत माने यांनाही आज कोरोना झाल्याचे निष्षन झाले आहे. त्यांच्या पत्नी व ...

राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना कोरोनाची लागण; पुण्यात उपचार सुरू
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत माने यांनाही आज कोरोना झाल्याचे निष्षन झाले आहे. त्यांच्या पत्नी व मुलीला तसेच त्यांचे स्वीय सहायक यांचाही अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. ते सध्या पुण्यात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आपली प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. माने हे इंदापूर तालुक्यात राहतात.
यशवंत माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत़ माने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. मागील काही महिन्यांपासून आमदार यशवंत माने हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक बैठकीस पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत उपस्थित राहत होते. शिवाय राज्याच्या विविध खात्याचे मंत्री हे सोलापूर जिल्हा दौºयावर असताना कोरोना आढावा बैठक घेतली त्यावेळी आमदार माने यांनी उपस्थिती दर्शविली होती.