महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न दोन खासदार, ५ आमदारांची भूमिका महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:18 IST2026-01-05T19:17:35+5:302026-01-05T19:18:10+5:30
जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याला फारसे यश झाले आहे. त्याचा फटका सर्वच पक्षांना बसला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) ने अकलूजमध्ये सत्ता मिळविली.

महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न दोन खासदार, ५ आमदारांची भूमिका महत्त्वाची
सोलापूर : महापालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी करूनच लढण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या बैठकीत रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्यात दोन खासदार, पाच आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याला फारसे यश झाले आहे. त्याचा फटका सर्वच पक्षांना बसला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) ने अकलूजमध्ये सत्ता मिळविली. तर उद्धवसेनेने कुडूवाडी नगराध्यक्षपद मिळविली. बहुमत मात्र राष्ट्रवादी (अजित पवार) कडे राहिली. त्यामुळे सोलापूर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना, माकप,
हालचालींना वेग महाविकास आघाडीत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे नेतृत्व आहे. मात्र, नगरपालिकेत महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला नाही. आ. दिलीप सोपल, आ. राजू खरे, आ. नारायण पाटील, आ. उत्तम जानकर, आ. अभिजित पाटील, असे पाच आमदार महाविकास आघाडीचे असून त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. त्याचा फटका बसला. त्यातून धडा घेत आता महापालिकेत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मनसेची महाविकास आघाडी करण्यात आली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची ताकद एकवटण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मोहोळमध्ये बैठक.. एकसंघ राहण्याचा निर्णय
मोहोळ : येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याबाबत मोहोळ तालुका महाविकास आघाडीची बैठक मोहोळ येथे पार पडली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकसंघ करून आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी संयुक्तपणे तालुक्यात दौरा करणे, इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागविणे व महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत आवाज उठवून सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करणे तसेच जनतेत सरकार विरोधात असलेला असंतोष जनतेसमोर मांडणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संजय क्षीरसागर, सुरेश शिवपुजे, अशोक भोसले, तुकाराम माने, सत्यवान देशमुख, दादासाहेब पवार, सतीश पाटील, दत्तात्रय पाटील, विलास पाटील, धनाजी गायकवाड, अनिल महानवर, बंडू देवकते पप्पू पाटील, विकास जाधव, धीरज कसबे, अॅड. विठोबा पुजारी, संतोष कारंडे आदी उपस्थित होते.