Beraking; कर्नाटकातून औरंगाबादकडे जाणारा ८० पोती गुटखा सांगोल्याजवळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 12:25 IST2021-05-25T12:24:19+5:302021-05-25T12:25:57+5:30

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Gutkha from Karnataka to Aurangabad seized; Local Crime Branch action | Beraking; कर्नाटकातून औरंगाबादकडे जाणारा ८० पोती गुटखा सांगोल्याजवळ जप्त

Beraking; कर्नाटकातून औरंगाबादकडे जाणारा ८० पोती गुटखा सांगोल्याजवळ जप्त

सोलापूर - कर्नाटक राज्यातून औरंगाबादकडे ८० पोते भरून निघालेल्या ट्रकवर सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोला येथे कारवाई केली. 

दरम्यान, सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोला-मिरज रोडवरील हॉटेल गोकुळ येथून कर्नाटकातून औरंगाबादकडे ८० पोते गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोल्याजवळ सापळा रचला होता. पहाटे पाचच्या सुमारास प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला. त्यात पाहणी केली असता ८० पोती गुटखा आढळून आला. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Web Title: Gutkha from Karnataka to Aurangabad seized; Local Crime Branch action