गणपतराव देशमुखांची प्रकृती स्थिर; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:00 IST2021-07-28T10:59:59+5:302021-07-28T11:00:26+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

गणपतराव देशमुखांची प्रकृती स्थिर; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सोलापूर - सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापुरातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून नागरिकांनी व विशेषत: सांगोला तालुक्यातील जनतेंनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी केले आहे.
सांगोला तालुक्यतील सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनंती की, कोणत्या ही अफवांना बळी पडू नका,आबासाहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बी पी नॉर्मल आहे. शेकापचे नेते भाई जयंत पाटील हे थोड्या वेळात सोलापूरला येत असून ते साहेबाना भेटतील आणि डॉक्टरांबरोबर चर्चा करणार आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, काळजी करण्याचे कोणते ही कारण नाही तसेच आबासाहेब लवकर बरे व्हावेत म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करावी असेही आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी केले आहे.