न्यायालयीन कर्मचाºयाचा कोरोनाने मृत्यू; कर्मचाºयांनी वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:11 IST2020-07-18T12:09:44+5:302020-07-18T12:11:53+5:30

कामासाठी सोलापूर ते मोहोळ असा केला होता प्रवास

Coroner's death of court employee; The staff paid tribute to Vahili | न्यायालयीन कर्मचाºयाचा कोरोनाने मृत्यू; कर्मचाºयांनी वाहिली श्रद्धांजली

न्यायालयीन कर्मचाºयाचा कोरोनाने मृत्यू; कर्मचाºयांनी वाहिली श्रद्धांजली

ठळक मुद्दे- सोलापूर शहरात कोरोनाची रूग्णसंख्या वाढली- क्वारंटाईन केंद्रातही संपर्कातील रूग्ण दररोज वाढत आहेत- सोलापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग झाला सतर्क

सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत जात आहेत़ दरम्यान, जुळे सोलापुरात राहणाºया एका न्यायालयीन कर्मचाºयाचा कोरोनाने शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.

जुळे सोलापुरातील लक्ष्मी बँक कॉलनीत राहणाºया या कर्मचाºयाने कामासाठी सोलापूर ते मोहोळ असा मोटारसायकलवरून प्रवास केला होता. यातून या कर्मचाºयास गेल्या आठवड्यात त्रास झाला होता. त्यामुळे उपचारासाठी तो रूग्णालयात दाखल झाल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांची आई, पत्नी व मुलास क्वारंटाईन केले असता त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व जणांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्या कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सहकारी कर्मचाºयांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


 

Web Title: Coroner's death of court employee; The staff paid tribute to Vahili