कुरुल-मोहोळ रस्त्यावर कारचा अपघात; चालक ठार, प्रवासी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:19 IST2020-05-30T12:17:02+5:302020-05-30T12:19:16+5:30
शनिवारी पहाटेची घटना; घटनास्थळी पोलीस दाखल

कुरुल-मोहोळ रस्त्यावर कारचा अपघात; चालक ठार, प्रवासी गंभीर जखमी
सोलापूर : कुरुल ते मोहोळ रस्त्यावर काल शुक्रवारी २९ रोजी रात्री उशिरा पुण्यावरून मंगळवेढा येथे प्रवासी भाडे पोहोचवून रात्री परत पुण्याकडे जात असताना कुरुल गावालगत कुत्रे आडवे आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.
दरम्यान, याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कार क्रमांक एम एच १२ एचझेड २३१९ ही गाडी पलटी झाली. यामध्ये चालक किशोर विलास अभंग (वय २७ , रा. रांजणगाव, ता. शिरुर, जिल्हा - पुणे) हा गंभीर जखमी होऊन मयत झाला तर गाडीतील अन्य एक प्रवासी तुळशीदास लक्ष्मण ढगे (वय २४, रा. निंबोणी, ता. मंगळवेढा) हा जखमी झाला आहे. याबाबत जखमी ढगे याने फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार बबलू नाईकवाडी हे करीत आहेत.