३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून; सांगोला तालुक्यातील घटना 

By Appasaheb.patil | Updated: January 14, 2023 09:59 IST2023-01-14T09:58:48+5:302023-01-14T09:59:46+5:30

ही घटना गस्तीवरील पोलीस अधिकारी यांना एखतपुर- आचकदाणी रोडवर उघडकीस आली. 

brutal murder of 34 year old youth incidents in sangola taluka | ३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून; सांगोला तालुक्यातील घटना 

३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून; सांगोला तालुक्यातील घटना 

सांगोला : अज्ञात कारणावरून ३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही घटना गस्तीवरील पोलीस अधिकारी यांना एखतपुर- आचकदाणी रोडवर उघडकीस आली. 

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या तरुणाच्या खुनाच्या घटनेमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. संजय तुकाराम इंगोले (३४ रा एखतपुर ( काखेची वस्ती ) ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी एखतपुर ते अचकदाणी रोडवर शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारास गस्तीवर होते, त्यावेळी त्यांना आचकदाणी रोड लगत तरुण मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. 

उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले , पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर, पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे आदी पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: brutal murder of 34 year old youth incidents in sangola taluka