Breaking; काय म्हणता.. विशाल फटे प्रकटला; पण युट्युबवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 14:30 IST2022-01-17T14:30:09+5:302022-01-17T14:30:20+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; काय म्हणता.. विशाल फटे प्रकटला; पण युट्युबवर !
सोलापूर : कोट्यवधी रुपयांच्या शेअर्स घोटाळाप्रकरणी सध्या गायब असलेला विशाल फटे अखेर सोमवारी दुपारी लोकांच्या मोबाईलवर प्रकटला. म्हणजे चक्क यूट्यूबवर.. त्यानं अर्धा तासाचा आपला व्हिडिओ शेअर केला.
या व्हिडिओत विशाल फटे म्हणतोय की मला पळूनच जायचं असतं तर मी माझ्या बार्शीतील बँक खात्यामध्ये दोन कोटी रुपये ठेवून गेलोच नसतो. मी आजपर्यंत अनेकांना भरभरून पैसे दिले आहेत. ज्यांच्या पत्नीच्या गळ्यात साधा मणीही नव्हता, हीच मंडळी आता अनेक तोळ्यांचे दागिने घालून फिरताहेत. ज्यांना महिन्याला 8-9 टक्के अधिक फायदा करून दिला, ती मंडळीसुद्धा माझ्या विरोधात तक्रार करत आहेत, हे पाहून मला आश्चर्य वाटते. यात माझ्या आई-वडिलांचा अन् भावाचा काही संबंध नाही.
विशेष म्हणजे त्याने या युट्युब व्हिडीओला 'विशाल फटे स्कॅम टोल्ड बाय विशाल फटे,' असा मथळाही दिला आहे. युट्युबवर दिसणाऱ्या या व्हिडिओला अवघ्या दोन तासात हजारो लोकांनी पाहिले आहे.