Breaking; प्रेमप्रकरणातून सोहाळे येथे दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 13:15 IST2020-09-20T13:14:51+5:302020-09-20T13:15:43+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; प्रेमप्रकरणातून सोहाळे येथे दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
कामती : मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे एकवीस वर्षीय मुलाने व बावीस वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार रविवारी पहाटे उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सोहाळे येथे राहणारे ज्ञानेश्वर उर्फ आप्पा रामचंद्र बचुटे (वय २१ वर्ष ) व पूजा प्रवीण बचुटे (वय २२ वर्ष दोघे राहणार सोहाळे ता.मोहोळ) यांनी हे विकृत कृत्य केले आहे.
पूजा बचुटे हिचे मागील काही दिवसापूर्वी नागज फाटा (ता.सांगोला) येथे विवाह झाला होता. दहा दिवस ती सोहळे येथे आली होती. या घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस घटनास्थळी आले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.