Breaking; आजाराला कंटाळून महिलेने घेतला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 10:08 AM2021-06-20T10:08:03+5:302021-06-20T10:08:44+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Fed up with the disease, the woman was strangled at Karmala Sub-District Hospital | Breaking; आजाराला कंटाळून महिलेने घेतला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात गळफास

Breaking; आजाराला कंटाळून महिलेने घेतला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात गळफास

Next

करमाळा : कोरोना आजाराला कंटाळून निर्मला अनिल गायकवाड (वय ५०) वर्षे (रा. जेऊर ता. करमाळा) यांनी उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून दाखल करण्यात आले आहे.

तर सदरच्या महिलेला कोविड मध्ये गंभीर असल्याने तिला दुसऱीकडे पाठवण्याबाबत सांगण्यात आले होते, नेण्याआधीच तिने आत्महत्या केल्याने इतर रुग्णात भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे.

मागील सात दिवसापासून निर्मला गायकवाड या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोविड १९ बाबत उपचार घेत होत्या. त्यांचा एच आर सीटी स्कोर हा गंभीर असा २२ होता. त्यामुळे करमाळा उपजिल्हा रुग्णालयाने सदर रुग्णाला सोलापूर येथे घेऊन जाण्यास सांगितले होते. धाप लागण्याच्या त्रासाने दाखल केल्यानंतर तब्बेतील सुधारणा होत नसताना झालेल्या असाह्य वेदानामुळे निर्मला यांनी पहाटे साडे तीन वाजण्याच्या पुर्वी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील कोव्हीड वाँर्डमध्ये खिडकीच्या लोखंडी गजाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसुन आले.

Web Title: Breaking; Fed up with the disease, the woman was strangled at Karmala Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app