Breaking; The boat capsized while taking a selfie in the boat; Baap-leka drowned | Breaking; बोटीत सेल्फी काढताना बोट उलटली; पाण्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू

Breaking; बोटीत सेल्फी काढताना बोट उलटली; पाण्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू

करमाळा : अकलूज येथील बाप-लेकाचा वांगी-३ परिसरात उजनी जलाशयात बोटीत सेल्फी काढताना बोट उलटल्याने बुडून मृत्यू झाला. मयत  व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलीसह अन्य दोघांना वाचविण्यात यश आलेले आहे.


आज रविवारी अकलूज येथील विकास गोपाळ शेंडगे (वय ३९), स्वाती विकास शेंडगे (वय ३०), जय विकास शेंडगे (वय १३), अंजली विकास शेंडगे (वय-९) हे सर्व करमाळा तालुक्यातील केम येथे नातेवाईकाकडे लग्न कार्यासाठी आले होते, त्यानंतर ते सर्व वांगी नं-३ येथे मित्र जयवंत सातव यांच्याकडे गेले होते.

मित्र सातव यांनी शेंडगे कुटुंबीयांना बोटीतून फिरण्याची इच्छा झाल्याने ते उजनी जलाशयात मासेमारीसाठी असलेल्या बोटीतून दुपारी पावणे तीन वाजता सातव यांच्या बरोबर फिरण्यासाठी गेले असता बोट खोल पाण्यात गेल्यावर ते सेल्फी काढत असताना बोट पलटल्याने सर्व जण पाण्यात बुडले असता विकास शेंडगे आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा बुडून मृत्यू झाला तर विकास शेंडगे यांची पत्नी स्वाती शेंडगे आणि त्यांची मुलगी अंजली शेंडगे, जयवंत सातव व त्यांचा मुलगा यांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांना यश आले. स्वाती शेंडगे व अंजली शेंडगे यांना पुढील उपचारासाठी कुटीर रूग्णालयात दाखल केलेले असून पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.

Web Title: Breaking; The boat capsized while taking a selfie in the boat; Baap-leka drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.