मोठी बातमी; शिरापुरात बिबट्याचा दुसरा हल्ला; दोन वर्षांच्या वासराला फाडून खाल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 08:03 IST2021-08-06T08:01:56+5:302021-08-06T08:03:11+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Second leopard attack in Shirapur; The two-year-old calf was torn and eaten | मोठी बातमी; शिरापुरात बिबट्याचा दुसरा हल्ला; दोन वर्षांच्या वासराला फाडून खाल्ले

मोठी बातमी; शिरापुरात बिबट्याचा दुसरा हल्ला; दोन वर्षांच्या वासराला फाडून खाल्ले

सोलापूर : शिरापुर सो (तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ) लांबोटी शिरापूर रोडवर बापू अशोक ताकमोगे या शेतकऱ्याची शेती (लांबोटीपासून १ एक किलोमीटर अंतरावर) शिरापूर रस्त्यावर आहे. साधारणत पहाटे चार ते पाच च्या सुमारास बिबट्याने दिड दोन वर्षाच्या वासरला पूर्णतः फाडून त्याच्यातील हृदयाचा भाग खाऊन, त्या वासराचा एक पाय ही पूर्णता खाल्ला आहे.

शिरापूरमधली ही दुसरी घटना आहे. मंगळवारी पहाटे दिग्विजय ताकमोगे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला होता. दिग्विजयची वस्ती आणि बापू ताकमोगे यांची वस्ती यामध्ये साधारणत : सहा किलोमीटरचे अंतर आहे. बिबट्या आता हळूहळू लांबोटी परिसरामध्ये आला आहे.

Web Title: Big news; Second leopard attack in Shirapur; The two-year-old calf was torn and eaten