मोठी बातमी; अवैध वाळू वाहतुकीवर धाड; तीन जेसीबीसह सहा ट्रॅक्टर केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 13:09 IST2021-08-27T13:08:48+5:302021-08-27T13:09:15+5:30

सांगोला पोलिसांची मोठी कारवाई - बारा जणांना घेतले ताब्यात

Big news; Raids on illegal sand transport; Six tractors with three JCBs seized | मोठी बातमी; अवैध वाळू वाहतुकीवर धाड; तीन जेसीबीसह सहा ट्रॅक्टर केले जप्त

मोठी बातमी; अवैध वाळू वाहतुकीवर धाड; तीन जेसीबीसह सहा ट्रॅक्टर केले जप्त

सांगोला - गोपनीय माहितीच्या आधारे सांगोला पोलिसांनी अचानक धाड टाकून  बेकायदेशीर वाळूचे उत्खनन करुन वाहतूक करताना तीन जेसीबी सहा ट्रॅक्टर पकडून जप्त केले. याप्रकरणी बारा जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज शुक्रवार पहाटे  पाचच्या सुमारास कोळे ता. सांगोला अंतर्गत (देशमुख वस्ती) या ठिकाणी केली.

पोलिसांनी जप्त केलेली ट्रॅक्टरसह जेसीबी सांगोला पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले , पोलीस नाईक राजू चौगुले , पोलीस नाईक विजय थिटे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, पोलीस कॉस्टेबल शिंदे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 

Web Title: Big news; Raids on illegal sand transport; Six tractors with three JCBs seized