मोठी कारवाई; औरंगाबादकडे निघालेला ४५ पोती गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 17:32 IST2021-09-01T17:31:56+5:302021-09-01T17:32:02+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

मोठी कारवाई; औरंगाबादकडे निघालेला ४५ पोती गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला
सांगोला - निपाणी येथून सांगोलामार्गेऔरंगाबादकडे क्रेटच्या आडून सुमारे ४५ पोती हिरा गुटख्याची वाहतूक करताना एम एच-ईएल - ५८४९ हा टेम्पो पकडला. ही कारवाई आज बुधवार दुपारी २:३० च्या सुमारास सांगोला -कडलास रोडवरील सांगोला महाविद्यालय जवळ केली.
याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक मालक यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तुकाराम व्हरे, पोलीस नाईक आप्पा पवार] पोलीस नाईक राहुल देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शिंदे यांनी केली आहे.