'भगीरथ दादा' चक्क 'भारत नानां'च्या वेशात; ही निवडणूक इमोशनल पातळीवर लढविली जाणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 12:09 IST2021-03-30T12:08:55+5:302021-03-30T12:09:33+5:30
घराबाहेर पडण्यापूर्वी भगीरथ दादांना त्यांच्या आईंनी आशीर्वादही दिले

'भगीरथ दादा' चक्क 'भारत नानां'च्या वेशात; ही निवडणूक इमोशनल पातळीवर लढविली जाणार !
पंढरपूर : पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांची टोपी अन् दाढी ही त्यांची स्वतंत्र ओळख होती. आता त्यांचे सुपुत्र भगीरथ दादाही त्याच पद्धतीचा वेश धारण करून आज राष्ट्रवादीतर्फे अर्ज भरायला गेले. यावरुन यंदाची पोटनिवडणूक भावनिक पातळीवर लढविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले.
अर्ज भरायला जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भगीरथ भालके म्हणाले की माझं दुःख हे माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला आहे. पण ज्या जनतेने नानांवर जीवापाड प्रेम केले, दगडातील देवांवर विश्वास कमी पण अडचणीच्या काळात नानांवर जास्त विश्वास ठेवला.
आज जनतेला नानांच्या विचारांची व आधाराची गरज आहे. तोच विचार अन तोच विकासाचा ध्यास घेऊन आज देह जरी माझा असला तरी अंगात नसानसात स्व. भारत नानांचे रक्त आहे. हा ड्रेस घालून घराबाहेर पडण्यापूर्वी भगीरथ दादांना त्यांच्या आईंनी आशीर्वादही दिले.