आजाराला कंटाळून चिखर्डेत गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 1, 2023 17:30 IST2023-06-01T17:29:40+5:302023-06-01T17:30:26+5:30

१ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.

an old man hanging himself in chikhard due to illness | आजाराला कंटाळून चिखर्डेत गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

आजाराला कंटाळून चिखर्डेत गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

काशिनाथ वाघमारे, सोलापूर:बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे एका वृद्धाने स्वतःच्या शेतात आजाराला कंटाळून चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना १ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.

व्यंकट रामभाऊ कोंढारे (वय ७५, रा. चिखर्डे, ता. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव असून याबाबत तुषार रवींद्र कोंढारे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार गुरुवार, १ जून रोजी तुषार कोंढारे हे जेवण आटोपून ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता त्यांचे चुलत आजोबा व्यंकट रामभाऊ कोंढारे यांनी स्वतःच्या शेतात चिंचेच्या झाडास आजाराला कंटाळून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ चुलते नंदकुमार व्यंकट कोंढारे यांना फोनवरुन याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या पाच वर्षापासून ते आजाराशी सामना करीत होते. याबाबत पांगरी पोलीस ठाण्यत अकस्मात अशी नोंद झाली असून पुढील तपास पोलीस नाईक पांडुरंग मुंडे हे करीत आहेत.

Web Title: an old man hanging himself in chikhard due to illness