अवैध वाळू उपसा करणाºया सहा गाड्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:18 IST2020-01-22T13:16:43+5:302020-01-22T13:18:14+5:30
अक्कलकोट तहसिल विभाग; १८ लाख ७५ हजाराचा केला दंड

अवैध वाळू उपसा करणाºया सहा गाड्यांवर कारवाई
ठळक मुद्दे- अक्कलकोट तहसिल विभागाची कारवाई- तहसिलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई- १८ लाख ७५ हजार रूपयाचा केला दंड
सोलापूर : विनापरवाना अवैध वाळु उपसा करून वाहतुक करणाºया सहा गाड्यांवर अक्कलकोट तहसिल विभागाने बुधवारी सकाळच्या सुमारास कारवाई केली.
याप्रकरणी ट्रक चालकांना १८ लाख ७५ हजार रूपयाचा दंड केला असून ही कारवाई तहसिलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईनंतर कारवाई केलेली वाहने तहसिल कार्यालय आवारात उभी करण्यात आलेली आहेत़ या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाºयांची धाबे दणाणले आहेत.