हिजाब घालणारी महिला एक दिवस पंतप्रधान बनेल; असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:33 IST2026-01-09T18:33:19+5:302026-01-09T18:33:34+5:30
सोलापूरच्या सभेत ओवेसी बोलत होते.

हिजाब घालणारी महिला एक दिवस पंतप्रधान बनेल; असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे विधान
आप्पासाहेब पाटील/सोलापूर : पाकिस्तानच्या घटनेत लिहिलेले आहे की एकाच धर्माचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणताही भारतीय व्यक्ती पंतप्रधान बनू शकतो. एक दिवस असा येईल की, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल असा विश्वासही असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापूरच्या सभेत व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नरेंद्र मोदीच्या कुशीत बसले आहेत. अजित पवारांना व्होट म्हणजे मोदींना व्होट. अजित पवारला व्होट म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काही घेणे-देणे नाही, पण आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही त्रिमूर्ती ही एकच आहेत. ते तुमच्यासमोर येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील, त्यांना मतपेटीतून उत्तर द्या असे आवाहन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केले.
इतक्या वर्षे सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनापक्षाने काहीच केलं नाही. महागाई वाढली, अत्याचाराच्या घटना वाढल्या, महागाई वाढल्याचेही ते म्हणाले. आमच्या युवा कार्यकर्त्याने इस्त्रायलचा निषेध केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला. बहुतेक गुन्हा दाखल करणारा नेत्यानाहूचा पुतण्या असेल, त्याचा नाव नेत्यानाहूचा पुतण्या म्हणूनच ओळखलं जाईल अशी टीका ओवेसी यांनी केली. शेतकरी आत्महत्या, अल्पसंख्याक लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारं हे शासन असल्याचेही ते म्हणाले.