Sindhudurg: चेकलिस्टवर सही करण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच, उपअभियंता अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:59 IST2025-05-21T12:59:15+5:302025-05-21T12:59:46+5:30

कुडाळ : सोलर पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी ५ हजार रुपये मागणी करणाऱ्या कुडाळ महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग ...

Deputy Executive Engineer of Kudal Mahavitaran Office Vijay Narsingh Jadhav arrested while accepting a bribe of Rs 5000 to sign the checklist of solar panels | Sindhudurg: चेकलिस्टवर सही करण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच, उपअभियंता अटकेत

Sindhudurg: चेकलिस्टवर सही करण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच, उपअभियंता अटकेत

कुडाळ : सोलर पॅनलचे चेकलिस्टवर सही करण्यासाठी ५ हजार रुपये मागणी करणाऱ्या कुडाळमहावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.

कुडाळ येथील तक्रारदार हे अल्पी पोलराईज्ड टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सोलरचे काम करतात. त्यांनी बसवलेल्या सोलर पॅनलच्या चेकलिस्टवर सही करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता (वर्ग २) विजय जाधव यांनी ५ हजार रुपये मागितले होते. याबाबत ५ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली. होती या तक्रारीची प्रतिबंध विभागाने पडताळणी करुन सापळा रचण्यात आला. 

मंगळवारी या सापळ्यामध्ये महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विजय जाधव हे अडकले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित अधिनियम २०१८)चे कलम ७ प्रमाणे कुडाळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक मनोज जिरगे यांच्यासह पोलिस हवालदार पालकर, पोलिस हवालदार जनार्दन रेवणकर, अजित खंडे यांनी केली.

Web Title: Deputy Executive Engineer of Kudal Mahavitaran Office Vijay Narsingh Jadhav arrested while accepting a bribe of Rs 5000 to sign the checklist of solar panels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.