लग्नानंतर समजले पतीचे नपुंसकत्व, वाई तालुक्यातील घटना
By दत्ता यादव | Updated: December 11, 2022 21:26 IST2022-12-11T21:26:15+5:302022-12-11T21:26:30+5:30
हा प्रकार लपविण्यासाठी विवाहितेचा छळ

लग्नानंतर समजले पतीचे नपुंसकत्व, वाई तालुक्यातील घटना
सातारा : लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उच्च शिक्षित असलेला आपला पती नपुंसकत्व असल्याचे विवाहितेला समजले. पणही गोष्ट लपवून ठेवण्यासाठी तिचा जाचहाट सुरू झाला. अखेर सासरच्या लोकांचा जाचहाट असाह्य झाल्याने पीडित विवाहितेने वार्इपोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
वार्इ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिताही उच्च शिक्षित असून, ती एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. २०२१ मध्ये त्या तरूणीचे एका उच्च शिक्षित तरूणाशी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच पती नपुंसकत्व असल्याचे तिला समजले. पण ही गोष्ट तिने कोणालाही न सांगण्यासाठी तिचा छळ सुरू झाला. पती तिला वारंवार मारहाण करू लागला. लग्नात दिलेले सहा तोळ्यांचे दागिनेही तिच्याकडून काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित विवाहितेने वार्इ पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीसह सासू, सासऱ्यांविरोधात तक्रार दिली.