Coronavirus : चीनमध्ये अडकलेल्या 90 भारतीयांचे मायभूमीत आगमन, कुटुंबीयांना अत्यानंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 08:10 AM2020-02-27T08:10:34+5:302020-02-27T08:12:55+5:30

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्याची कन्या असलेल्या अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता.

90 Indians from China welcomed into the ground, family members cheered | Coronavirus : चीनमध्ये अडकलेल्या 90 भारतीयांचे मायभूमीत आगमन, कुटुंबीयांना अत्यानंद 

Coronavirus : चीनमध्ये अडकलेल्या 90 भारतीयांचे मायभूमीत आगमन, कुटुंबीयांना अत्यानंद 

Next

सातारा/मुंबई - गेल्या महिन्यापासून चीनमध्ये अडकून पडलेल्या 90 भारतीयांची आरोग्य तपासणी बुधवारी झाली. त्यानंतर आज शुक्रवारी पहाटे राजधानी दिल्ली येथे त्यांचे आगमन झाले. रोगाच्या विळख्यात अडकलेल्या भारतीयांनी मायभूमीवर पाऊल ठेवताच सुटकेचा निश्वास टाकला. साताऱ्याच्या कन्या अश्विनी पाटील यांनीही मायभूमीत येताच आनंद व्यक्त करत, लोकमतने दाखवलेल्या तत्परतेचे आभार मानले. 

चीनमधील वुहानमध्ये अडकल्या साताऱ्यातील अश्विनी पाटील

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्याची कन्या असलेल्या अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर, सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते भारतीय दूतावासाशी संपर्कात होते. तर, भारतीय दुतावास चीन सरकारशी समन्वय साधत होता. अखेर बुधवारी चीनमध्ये अडकलेल्या 90 भारतीयांची तपासणी झाली. त्यांना भारतात आणण्यासाठी वुहान येथे विमान पाठविण्यात आले. आज पहाटेच्या सुमारास या सर्वच भारतीयांची घरवापसी झाली. आपल्या भारत भेटीनंतर सर्वांनीच अत्यानंद व्यक्त केलाय. 

... तर उद्याच चीनमधील 90 भारतीय 'मायदेशी' येतील, पृथ्वीराज बाबांनी करून दाखवलं 

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर भारताने खास विमानाने तेथे अडकलेल्या भारतियांना मायदेशी परत आणले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच तपासणी न झाल्याने अनेक भारतीय अद्याप चीनमध्ये अडकले आहेत. भारतीय दूतावासाने चीनमधील या भारतीयांना संदेश पाठवून तपासणीची माहिती दिली. बुधवारी संध्याकाळी सुरू झालेली तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. या तपासणीनंतर गुरुवारी पहाटे भारतीयांचे विमान दिल्लीत दाखल झाले.  

Video : चीनमध्ये अडकलेल्या अश्विनीला पृथ्वीराज 'बाबांचा' व्हॉट्सअप कॉल

कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना

चीनमधील आपले नातेवाईक कधी परत येणार याची पालकांना काळजी होती. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यामुळे ते आता भारतात येऊ शकतील, या विश्वासाने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर, आज पहाटे 90 भारतीयांसह दिल्लीत विमानाचे लँडींग झाल्याने सर्वांच्याच कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना असा झालाय. अश्विनी पाटील यांच्या आई अनिता आणि वडिल अविनाश पाटील यांनीही लेकीचा माहेरी म्हणजेच मायदेशी येण्याचा आपल्याला सर्वाधिक आनंद झाल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.  
 

Web Title: 90 Indians from China welcomed into the ground, family members cheered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.