7.5% voting for Satara Lok Sabha and Vidhan Sabha | Maharashtra Election 2019 : सातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी ४८.४५ टक्के मतदान

Maharashtra Election 2019 : सातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी ४८.४५ टक्के मतदान

ठळक मुद्देसातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी ४८.४५ टक्के मतदानलोकसभेसाठी ४९.५७ तर विधानसभेसाठी ४५.३६ टक्के मतदान

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या आठ मतदारसंघांसाठी सोमवारी सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास पावसाळी वातावरण असल्याने मतदार अधिक संख्येने बाहेर पडले नव्हते. मात्र, दुपारी तीन वाजेपर्यंत लोकसभेसाठी ४९.५७ टक्के तर विधानसभेसाठी ४५.३६ टक्के असे एकुण ४८.४५ टक्के मतदान झाले. सकाळी ११ पर्यंत जिल्ह्यात ११.१८ टक्के इतके मतदान झाले होते.

या मतदारसंघातील अनेक उमेदवारांनी सकाळीच कुटुंबासह येऊन मतदान केले. सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या आठ मतदारसंघांसाठी सकाळी सातपासून मतदानास सुरुवात झाली. सकाळी नऊपर्यंत मतदानास फारसा उत्साह नव्हता. तर सकाळी ११ पर्यंत राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील, सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंंहराजे भोसले, माण मतदारसंघात ह्यआमचं ठरलंयह्णचे उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट होते. परंतु सकाळपासून पावसाने उघडीप दिली असलीतरी ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे मतदानाला वेग येईल, अशी अपेक्षा होती. पण मतदानाला फारसा उत्साह कोठे जाणवला नाही.

दुपारी तीन वाजेपर्यंत लोकसभेसाठी ९ लाख १७ हजार १८१ मतदारांनी तर विधानसभेसाठी ३ लाख ४७ हजार ७४८ मतदारांनी हक्क बजावला. अकरा वाजेपर्यंत लोकसभेसाठी २ लाख १८ हजार ५१४ तर विधानसभेसाठी २ लाख ७२ हजार १६६ मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

दुपारी तीन वाजेपर्र्यंत वाईमध्ये १ लाख ६१ हजार ३६१, कोरेगावमध्ये १ लाख ५१ हजार ४८९, कºहाड उत्तरमध्ये १ लाख ४९ हजार २0१, कºहाड दक्षिणमध्ये १ लाख ४७ हजार ९३७, पाटणमध्ये १ लाख ५२ हजार ७३0 तर साताऱ्यामध्ये १ लाख ५४ हजार ४६३ मतदारांनी मतदान केले. फलटणमध्ये १ लाख ५४ हजार ३१७ तर माणमध्ये १ लाख ५0 हजार ४३१ मतदारांनी मतदान केले. एकुण १ कोटी २२ लाख १९२९ मतदारांनी मतदान केले.

सकाळी नऊ वाजेपर्यंत लोकसभेसाठी ७८ हजार १०६ मतदारांनी तर विधानसभेसाठी १ लाख ३ हजार १२७ मतदारांनी हक्क बजावला. त्यानंतर मतदारांची संख्या वाढत गेली. अकरा वाजेपर्यंत लोकसभेसाठी २ लाख १८ हजार ५१४ तर विधानसभेसाठी २ लाख ७२ हजार १६६ मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडले.


उमेदवारांचे सहपरिवार मतदान

मतदारसंघ मोठे असल्याने उमेदवार दिवसभर फिरणार आहेत. त्यामुळे त्यांनी सकाळीच सहपरिवार मतदान केले. उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई आदींनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

 

Web Title: 7.5% voting for Satara Lok Sabha and Vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.