Maharashtra Vidhan Sabha 2019 : गौरव नायकवडी म्हणाले, मी तुमचा मुलगा, मला आता आमदार केले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 16:10 IST2019-10-09T16:06:09+5:302019-10-09T16:10:19+5:30
मी तुमचा मुलगा आहे, त्यामुळे मला वाळवेकरांनी आता आमदार केले पाहिजे, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांनी केले.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : गौरव नायकवडी म्हणाले, मी तुमचा मुलगा, मला आता आमदार केले पाहिजे
वाळवा : मी तुमचा मुलगा आहे, त्यामुळे मला वाळवेकरांनी आता आमदार केले पाहिजे, असे आवाहन इस्लामपूरविधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांनी केले.
गौरव नायकवडी यांच्या प्रचार शुभारंभाची जाहीर सभा हुतात्मा चौक वाळवा येथे धो धो कोसळणाऱ्या पावसात पार पडली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या डोक्यावर छत्री धरणेचा प्रयत्न केला असता, त्यांनी छत्री मिटवून खाली ठेवली. त्यामुळे व्यासपीठावरील कोणीही हलले नाही, का सभेला उपस्थित कोणीही मतदार नागरिक किंवा महिला जागचे हलले नाहीत.
हुतात्मा चौकातून पावसाचे पाणी वाहात असताना लोकांनी जागा सोडली नाही, कां खासदार धैर्यशील माने यांनी आपले भाषण थांबविले नाही.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार भगवान साळुंखे, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी , जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्राचार्या डॉक्टर सुषमा नायकवडी, सरपंच डॉक्टर शुभांगी माळी , विक्रम पाटील, भिमराव माने, वैभव शिंदे, सागर खोत, अमोल पडळकर, वीरभद्र कुदळे, महादेव नलवडे, बाबासाहेब सुर्यवंशी, जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव पवार , शिवसेना व भाजप पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ पुरूष, महिला, युवक उपस्थित होते.