मिरजेत ५४ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन, घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेश तलाव व कृष्णाघाटावर गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:15 IST2025-09-02T19:15:31+5:302025-09-02T19:15:45+5:30

मिरज : मिरजेत सातव्या दिवशी शहरातील ५४ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे जल्लोषात व सवाद्य मिरवणुकांतून गणेश तलावात विसर्जन करण्यात आले. ...

Ganesh immersion of 54 mandals in Miraj, crowd at Ganesh Lake and Krishna Ghat for immersion of homemade Ganesh idols | मिरजेत ५४ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन, घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेश तलाव व कृष्णाघाटावर गर्दी 

मिरजेत ५४ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन, घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेश तलाव व कृष्णाघाटावर गर्दी 

मिरज : मिरजेत सातव्या दिवशी शहरातील ५४ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे जल्लोषात व सवाद्य मिरवणुकांतून गणेश तलावात विसर्जन करण्यात आले. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेश तलाव व कृष्णाघाटावर गर्दी होती.

सुमारे चारशे सार्वजनिक मंडळांपैकी अनेक मंडळांनी मंगळवारी दुपारपासूनच मिरवणुकीस सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने काढलेल्या मिरवणुकांमध्ये डीजे, ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद व मोरयाच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. 

विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा, यासाठी पोलिस उपाधीक्षक प्रणील गिल्डा व शहर पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भोई समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तलावात मूर्तींचे विसर्जन केले. भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देत विसर्जन सोहळा संपन्न झाला.

Web Title: Ganesh immersion of 54 mandals in Miraj, crowd at Ganesh Lake and Krishna Ghat for immersion of homemade Ganesh idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.