चालत्या मोटारसायकलच्या सिटखाली निघाला चक्क नाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 16:02 IST2021-02-17T16:01:00+5:302021-02-17T16:02:20+5:30
Snake Sangli-शिराळा येथील दिग्विजय शिंदे हे त्यांच्या दुचाकी वरून आपल्या शेतात जात असताना त्यांना आपल्या पायाजवळ नाग असलेला आढळला. त्यांनी तशीच गाडी सोडून बाजूला झेप घेतली.

चालत्या मोटारसायकलच्या सिटखाली निघाला चक्क नाग
विकास शहा
शिराळा- शिराळा येथील दिग्विजय शिंदे हे त्यांच्या दुचाकी वरून आपल्या शेतात जात असताना त्यांना आपल्या पायाजवळ नाग असलेला आढळला. त्यांनी तशीच गाडी सोडून बाजूला झेप घेतली.
त्यानंतर त्यांनी गाडीच्या आजूबाजूला बघितले असता त्यांना नाग आढळला नाही. त्यांनी त्यांचे सहकारी मित्र श्रीराम नांगरे पाटील, ऋषिकेश घोडे पाटील, बंधू राजेंद्र शिंदे यांना तात्काळ फोन करून बोलवून घेतले. यावेळी शेतात शोध घेतला असता नाग सापडला नाही.
यावेळी नाग चुकून गाडीत गेला काय ? ही शंका मनात आली असता तपासून बघितले असता नाग सीटच्या खाली असलेल्या पॅनलमध्ये अगदी दिसू नये असा जाऊन जाऊन बसला होता. यावेळी खूप प्रयत्न केल्यानंतर गाडीमधून या तरूणांनी नागाला बाहेर काढले व सुखरूपपणे त्याच्या अधिवासात सोडून दिले .