CoronaVirus Updates Sangli : म्हैसाळ येथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 14:27 IST2021-04-07T14:23:42+5:302021-04-07T14:27:13+5:30
CoronaVirus Updates Sangli : मिरज पाठोपाठ आज तालुक्यातील म्हैसाळ येथे सकाळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद करण्यात आले, तर विनामास्क फिरणाऱ्या काही दुचकीस्वारावर पोलिसांनी कारवाई केली.

CoronaVirus Updates Sangli : म्हैसाळ येथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : मिरज पाठोपाठ आज तालुक्यातील म्हैसाळ येथे सकाळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद करण्यात आले, तर विनामास्क फिरणाऱ्या काही दुचकीस्वारावर पोलिसांनी कारवाई केली.
कोरोना दिवसेंदिवस वाढत चालल्याने शासनाच्या वतीने मंगळवारपासून शहरी ठिकाणी कडक नियम करत अनेक व्यवसाय बंद करण्याचे काम सुरू आहे.
मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय विटेवरी व पोलीस हवालदार सुर्यंकात कदम यांनी गावात पेट्रोलिंग करत गावात सुरू असलेले अनेक व्यवसाय बंद करावे असे आवाहन व्यापारी वर्गाला केले.
गावात सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना मास्कचा वापर करा अशी सुचनाही त्यांनी वाहनधारकांना दिली तर विनामास्क फिरणाऱ्या काही दुचकीस्वारावर त्यांनी कारवाई केली.