Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भाजलेले की शिजवलेले? कोणते चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात-समजून घ्या

भाजलेले की शिजवलेले? कोणते चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात-समजून घ्या

Which Right Way To Chickpeas : नियमित चण्यांचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी तुम्ही कोणत्याही स्वरूपात चण्यांचे  सेवन करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 05:58 PM2024-06-18T17:58:28+5:302024-06-20T15:47:14+5:30

Which Right Way To Chickpeas : नियमित चण्यांचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी तुम्ही कोणत्याही स्वरूपात चण्यांचे  सेवन करू शकता.

Which Right Way To Chickpeas : How To Eat Chickpeas Roasted Or Soaked | भाजलेले की शिजवलेले? कोणते चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात-समजून घ्या

भाजलेले की शिजवलेले? कोणते चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात-समजून घ्या

चण्याला (Chickpeas) पोषक तत्वांचे भंडार म्हटले जाते. रोज चणे खाल्ल्यान शरीराला प्रोटीन्स, कार्ब्स, आयर्न आणि फायबर्स मिळतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते एक निरोगी व्यक्ती रोज 50 ते 60 ग्राम चण्यांचे सेवन करते. बरेचजण कोणत्या पद्धतीचे चणे खावेत याबाबत संभ्रमात असतात. (Benefits Of Chickpeas) चणे खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात. चण्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

नियमित चण्यांचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी तुम्ही कोणत्याही स्वरूपात चण्यांचे  सेवन करू शकता. भिजवलेले किंवा भाजलेले दोन्ही प्रकारचे चणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याच्या सेवनाने  शरीराला बरेच फायदे मिळतात. (Which Right Way To Chickpeas)

१) भाजलेले चणे (Roasted Chana)

भाजलेल्या चण्यांची चव अनेकांना आवडते. लोक नाश्त्याला किंवा चहाबरोबर या चण्यांचे सेवन करतात. डायबिटीसच्या रुग्णांसाठी भाजलेले चणे फायदेशीर ठरतात. ज्यामुळे हृदयाचे आजार टाळण्यासस मदत होते. 

२) भिजवलेले चणे (Soaked Chana)

भिजवलेले चणे पोषक तत्वांचा भंडार असतात. मोड आलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. भिजवलेले चणे मसल्स मजबूत बनवतात. यामुळे डायजेशनची समस्या उद्भवत नाही.

व्हिटामिन बी -१२ ची कमतरता तुमचं शरीर पोखरते, ४ पदार्थ खा- बी १२ कमी असल्याने होणारे गंभीर आजार टळतील

३) उकळलेले चणे (Boil Chana)

उकळलेल्या चण्यांचे सेवन हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरते. शरीराच्या आरोग्यसंबंधित समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते. 

चणे  खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात (Benefits Of Eating Chana)

चण्यांमध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. जर तुमचे डोळे कमकुवत झाले असतील तर चण्यांचे सेवन करू शकता, ज्यामुळे व्यवस्थित दिसते. चण्यांचे सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोल करू सकता.  चण्यांमुळे हाडं देखिल मजबूत राहतात यात कॅल्शियम, पोटॅशियम असते. चण्यातील एक्स्ट्रा ग्लुकोजचे प्रमाण डायबिटीस कंट्रोलसाठी फायदेशीर ठरते. 

केस गळतीमुळे टक्कल पडतंय? १० रूपयांच्या कढीपत्ता या पद्धतीने केसांना लावा, घनदाट होतील केस

चणे खाण्याची योग्य वेळ  कोणती (Which Right Time To Eat Chana)

तुम्ही चण्यांचे सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला सेवन करू शकता नेहमी हेवी ब्रेकफास्ट करा. चण्यांचे सेवन केल्याने जास्त भूक लागत नाही. म्हणूनच तुम्ही सकाळच्यावेळी चण्यांचे सेवन करू शकता. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल  तर संध्याकाळच्या नाश्त्याला याचे सेवन करा.  सकाळच्यावेळी भिजवलेले चणे खाल्ल्याने आरोग्याला बरेच  फायदे मिळतात. रात्रीच्या जेवणाला तुम्ही या चण्यांचे सेवन करू शकता. 

Web Title: Which Right Way To Chickpeas : How To Eat Chickpeas Roasted Or Soaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.