Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > world idli day 2021:डाळीशिवाय रस्सम आणि गरमागरम इडली-आप्पे, खाओ और खुश हो जाओ!

world idli day 2021:डाळीशिवाय रस्सम आणि गरमागरम इडली-आप्पे, खाओ और खुश हो जाओ!

इडली ही सांबार-चटणी यांच्यासोबत् खाल्ली जाते. पण आता पारंपरिक पध्दतीने बनवल्या जाणाऱ्या इडलीतही नवनवीन प्रयोग केले जात आहे. तसेच इडलीचं पीठ वापरुन त्याच्या इडल्या न बनवता वेगवेगळे प्रकार बनवले जातात. इडलीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या सांबार चटणीमधेही खूप प्रयोग होऊ लागले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 06:10 PM2021-03-30T18:10:07+5:302021-03-30T18:28:26+5:30

इडली ही सांबार-चटणी यांच्यासोबत् खाल्ली जाते. पण आता पारंपरिक पध्दतीने बनवल्या जाणाऱ्या इडलीतही नवनवीन प्रयोग केले जात आहे. तसेच इडलीचं पीठ वापरुन त्याच्या इडल्या न बनवता वेगवेगळे प्रकार बनवले जातात. इडलीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या सांबार चटणीमधेही खूप प्रयोग होऊ लागले आहेत.

What is the new alternative to the nutritious Idli Sambar that has changed over time? | world idli day 2021:डाळीशिवाय रस्सम आणि गरमागरम इडली-आप्पे, खाओ और खुश हो जाओ!

world idli day 2021:डाळीशिवाय रस्सम आणि गरमागरम इडली-आप्पे, खाओ और खुश हो जाओ!

Highlightsआप्प्याचे वैशिष्ट्य हे की त्यासाठी फार वेगळा खटाटोप पडत नाही,इडली पीठ असलं की झालं.नेहमीची इडली ,डोसा, उत्तप्पा,उपमा यांचा कंटाळा येतो तेव्हा वेगळं म्हणून डिब्बा रोटी  झकास लागते.ही आंध्र प्रदेशाची पाककृती आहे. अगदी सोपी आणि सुटसुटीत.डाळ पचत नसल्यास डाळीशिवायचं सांबारही करता येतं. 

- शुभा प्रभू साटम

इडली हा अतिशय लोकप्रिय नाश्ता प्रकार आहे. केवळ लोकप्रिय नाही तर इडली ही पौष्टिकही आहे.दक्षिणेकडे तर इडली सांबार म्हणजे परिपूर्ण  आहार समजला जातो. आपल्याकडे हलक्या फुलक्या आहारासाठी इडलीची निवड केली जाते.  आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे इडली पीठातील प्रथिनं आणि खनिजं पचण्यास हलकी होतात. त्यामुळे इडली पचण्यास हलकी होते. तसेच तांदळासोबत उडीद दाळ हे कॉम्बिनेशन असल्याने इडलीत जास्त उष्मांक नसतात. पोषणतज्ज्ञ हे दोन इडली आणि चटणी  हा नाश्ता आपल्या शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा देण्यास पुरेसा असतो असं म्हणतात. 

इडली ही सांबार-चटणी यांच्यासोबत् खाल्ली जाते. पण आता पारंपरिक पध्दतीने बनवल्या जाणाऱ्या इडलीतही नवनवीन प्रयोग केले जात आहे. तसेच इडलीचं पीठ वापरुन त्याच्या इडल्या न बनवता वेगवेगळे प्रकार बनवले जातात. इडलीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या सांबार चटणीमधेही खूप प्रयोग होऊ लागले आहेत. इडली हा पौष्टिक प्रकार नाना तऱ्हा वापरुन चविष्ट केला जात आहे.

आप्पे
हा काही नवा प्रकार नाही,अनेक घरात होतो. आप्प्याचे वैशिष्ट्य हे की त्यासाठी फार वेगळा खटाटोप पडत नाही,इडली पीठ असलं की झालं. मग त्यात कांदा मिरची घालून पारंपरिक आप्पे करतात, या अस्सल भारतीय आप्प्यांना फिरंगी रूप देऊन त्यांना आणखी चविष्ट करता येतं.
कसं असतं की हापदार्थ जरी नेहमीचा असला तरीही त्यात थोडा पालट केला की ,आवडीनं खाल्ला जातो.  हे जे आप्पे आपण बघणार आहोत ते चक्क इटालियन ढंगाचे आहेत. 

आप्पे इटालियन/चिझी अप्पा

साहित्य:- इडलीचे पीठ, चीज किसून, इटालियन ड्राय हॅर्ब्स, नसल्यास काळी मिरी पूड आणि चिली फ्लेक्स, किंचित मीठ

कृती

चीज किसून घ्यावं,पिठात हे चीझ आणि बाकी साहित्य घालून व्यवस्थित एकजीव करावं आणि नेहमीच्या पद्धतीनं आप्पे करावेत, अत्यंत चविष्ट लागतात,आवडत असेल तर यात बेसिल पाने घालू शकता.

डिब्बा रोटी/मीनापा रोटी
ही आंध्र प्रदेशाची पाककृती आहे. अगदी सोपी आणि सुटसुटीत. आणि आवडीप्रमाणे आपण यात चव वाढवणारे व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो.नेहमीची इडली ,डोसा, उत्तप्पा,उपमा यांचा कंटाळा येतो तेव्हा वेगळं म्हणून ही रोटी झकास लागते,रोटी असं नाव असलं तरी ही रोटी नाही,तांदूळ भाकरी आणि उत्तपा यांच्यामधील प्रकार आहे.


 

साहित्य:-  इडली रवा १ वाटी उडीद डाळ १/२वाटी जिरे अर्धा चमचा, मीठ साखर, तेल तूप, ऐच्छिक:तळलेले काजू/ राई, चणाडाळ ,कढीलिंब, लाल सुक्या मिरच्या यांची फोडणी/ कांदा हिरवी मिरची परतून

कृती
उडीद डाळ साधारण चार तास भिजत घालावी.  इडली रवा फक्त पंधरा मिनिटं भिजवावा आणि पिळून घ्यावा.
 डाळ निथळवून मुलायम वाटावी. त्यात इडली रवा घालून नीट एकत्र करून घ्यावा. त्यात जिरे,मीठ,साखर,आणि ऐच्छिक साहित्यापैकी जे हवे ते घालून व्यवस्थित एकत्र करावे. खोलगट कढईत तेल/तूप घालून गरम करावं. त्यात डाळ रव्याचं मिश्रण घालावं.  मिश्रण पातळ पसरू नये,जाडसर हवं. केक सारखं. मंद आगीवर दोन्ही बाजूनं खरपूस भाजून घ्यावं.  वाटल्यास बाजूनं तेल/तूप सोडत राहावे. खमंग डब्बा रोटी तय्यार. केकसारखे तुकडे करून घ्यावे. सोबत चटकदार टोमॅटो चटणी भन्नाट लागते.


डाळीशिवाय रसम
रसम किंवा सांबार सर्व घरात होतं. आज आपण जे रसम पाहणार आहोत त्यात वेगळेपण हे की यात डाळ नाहीये,खूप लोकांना तूर डाळ किंवा चिंच सोसत नाही,अशासाठी तर हे रसम उत्तम पर्याय ठरतो.  परत वैयक्तिक आवडीनुसार यात भाज्या घालता येतात,सध्या पावसाळ्यात गार वातावरणात असे गरमागरम रसम आणि सोबत वडे/इडली छान वाटेल.


 

साहित्य:- मोठे लाल टोमॅटो माणशी एक असे. कोथिंबीर काड्या (असल्यास,कारण काड्याची चव अधिक खमंग असते,नसल्यास कोथिंबीर )४/५काड्या.
लसूण+आले आवडीनुसार मिरी जिरे १चमचा, हळद , लाल तिखट/हिरवी मिरची, गूळ, चिंच (ऐच्छिक), मीठ
फोडणीसाठी:-  तेल ,राई ,हिंग, कढीलिंब उडीद आणि चणा डाळ आता यात तुम्ही पुढील पदार्थ घालू शकता छोटे कांदे/शेवगा शेंग/वांगी/भोपळा/गाजर
कृती
टोमॅटो किंचित उकडून साल काढून घ्यावेत कोथिंबीर आले लसूण जिरे मिरी आणि हिरवी मिरची घालणार तर तेही सर्व छान वाटून घ्यावं.बाजूला ठेवावं. त्याच भांड्यात टोमॅटो वाटून घ्यावेत. कढईत तेल तापवून फोडणी करावी त्यात वाटण घालावं,परतून भाज्या घालणार असल्यास आता घालून बोटचेपे शिजवून घ्यावं,यात वाटलेले टोमॅटो घालावेत. व्यवस्थित परतून हळद ,मीठ, गूळ, चिंच कोळ, लाल तिखट ,सर्व घालून उकळी काढावी.आवडीप्रमाणे घट्ट पातळ करावं.भरपूर कोथिंबीर भुरभुरावी.
खमंग रसम तयार,नुसते सूप म्हणून प्यायला पण छान.

इडली बदलली तर मग सांबार आणि रसमही बदलायला हवं ना!

 


 

Web Title: What is the new alternative to the nutritious Idli Sambar that has changed over time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.