Fridge Water Side Effects: उन्हाचा वाढता पारा, घरात होणारी गरमी आणि सतत जाणारा घाम फारच त्रासदायक ठरतो. त्यामुळे या दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोक फ्रिजमध्ये ठेवलेल्या बॉटलमधील गार गार पाणी पितात. या पाण्यानं थोडा वेळ जरी बरं वाटत असेल पण आरोग्यासाठी ते फार नुकसानकारक ठरू शकतं. आजकाल वजन वाढल्यामुळं जास्तीत जास्त लोक हैराण असतात, वजन कमी करण्यासाठी ते नको नको ते करतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, फ्रिजमधील थंड पाणी पिऊनही त्यांचं वजन वाढतं. इतकंच नाही तर फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यानं अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
लठ्ठपणा वाढतो
थंड पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट हळूहळू वितळतं. लठ्ठपणा कमी करण्यास आणि फॅट बर्न करण्यास यामुळे समस्या होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर थंड पाणी अजिबात पिऊ नका. साधं पाणी प्यावं किंवा मडक्यातील पाणी प्यावं.
फ्रिजमधील पाणी ठरू शकतं घातक
उन्हाळ्यात लोक कशाचाही विचार न करता फ्रिजमधील पितात. फ्रिजमधून डायरेक्ट थंड पाणी काढून प्यायल्यानं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. तुम्हालाही अशी सवय असेल तर ही सवय लगेच बदला. कारण फ्रिजमधील थंट पाणी थेट प्यायल्याने लठ्ठपणासोबत इतरही गंभीर समस्या होतात.
हार्टसाठी घातक
फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने हार्टचं खूप जास्त नुकसान होतं. यामुळे ब्लड वेसल्स म्हणजे रक्तनलिका आकुंचन पावतात सोबतच ब्लड फ्लो सुद्धा हळुवार होतो. थंड पाण्यामुळे रक्तनलिका कठोर होतात आणि ज्यामुळे समस्या वाढू शकते.
पचन बरोबर होत नाही
थंड पाणी प्यायल्याने पचन तंत्र खराब होतं. कारण पोटात जेवण केल्यावर तयार झालेली अग्नि थंड पाण्यानं विझून जाते. ज्यामुळे पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होतात. अशात फ्रिजचं थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे.
एनर्जी लेव्हल कमी होते
थंड पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म सिस्टीम स्लो होतं. ज्यामुळे शरीर फॅट योग्यपणे रिलीज करू शकत नाही. अनेक हे कमजोरी आणि थकव्याचं कारण ठरू शकतं.
कफ वाढतो
जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने शरीरात कफ तयार होतो. जेव्हा शरीरात जास्त कफ तयार होतो तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि याच कारणाने सर्दी-खोकला वाढतो. त्यामुळे जेवण केल्यावर थोडं साधं पाणी प्यायल्यास समस्या होणार नाही.