Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरातला साधा भात 'या' पद्धतीनं खा; व्हेज अन्नातून मिळेल व्हिटामीन B-12, पोटही नीट साफ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:44 IST

Rice Kanji Vitamin B-12 Benefits (Fermented Rice Kanji Vitamin B-12) : व्हिटामीन बी-१२ डिएनए तयार करण्यासाठी, रक्तपेशी तयार करण्यासाठी तसंच मज्जासंस्थेच्या सुरक्षेत मदत करते.

रोज झोप घेतल्यानंतर आराम केल्यानंतर, हेल्दी डाएट घेतल्यानंतरही तुम्हाला थकवा, कमकुवतपणा, अशक्तपणा जाणवत असेल  तर हे व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आपल्या शरीराला व्यवस्थित कार्य करण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. (Fermented Rice Kanji Recipe For Gut Health and B-12)

यातीलच एक म्हणजे व्हिटामीन बी-१२. व्हिटामीन बी-१२ डिएनए तयार करण्यासाठी, रक्तपेशी तयार करण्यासाठी तसंच मज्जासंस्थेच्या सुरक्षेत मदत करते.  शरीरात या व्हिटामीन्सची कमतरता भासल्यामुळे अशक्तपणा येतो आणि थकल्यासारखं वाटतं. (Rice Kanji Vitamin B-12 Benefits)

शरीरातील व्हिटामीन बी-१२ कसं वाढवावं? (How To Increase Vitamin B-12)

बऱ्याच लोकांचा असा समज असतो की व्हिटामीन बी-१३ फक्त मांसाहारी अन्नातून मिळते. शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी-१२ कमतरता असते. काही रोजच्या खाण्यातले शाकाहारी पदार्थ व्हिटामीनची कमतरता पूर्ण करतात. त्यापैकीच एक म्हणजे राईस कंजी हा पदार्थ दही भाताप्रमाणे असतो. आहारात हा पदार्थ घेतल्यानं तुम्ही व्हिटामीन बी-१२ कमतरता पूर्ण करू शकता. राईस कंजी गट सायंसवर आधारित एक नॅचरल प्रोबायोटीक आहार आहे. याला फर्मेंटेंड राईस असंही म्हणतात.


भाताची ही रेसिपी (राईस कंजी) कशी करतात?

सगळ्यात आधी भात शिजवून घ्या. या शिजवलेल्या भातात थोडं पाणी आणि दही मिसळा, नंतर एका मातीच्या भांड्यात रात्रभर ठेवा. सकाळी हा पदार्थ तयार असेल. यात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, मीठ घालून तुम्ही खाऊ शकता. चव वाढवण्यासाठी तुम्ही खमंग फोडणी घालूनही हा भात खाऊ शकता. 

भात दह्याबरोबर रात्रभर ठेवल्यामुळे त्यात लॅक्टोबॅसिलस सारखे बॅक्टेरियाज वाढू लागतात हे बॅक्टिरेया फर्मेंटेशन दरम्यान व्हिटामीन बी-१२, फॉलेट आणि इतर महत्वाची एंजाईम्स बनवतात. ज्यामुळे पोषक तत्वांचे अवशोषण व्यवस्थित होते. 

या रेसिपीसाठी मातीच्या भांड्यांचा वापर असरदार ठरतो. ज्यामुळे  तापमान थंड राहते आणि गुड बॅक्टेरियाज वाढतात. राईस कंजी एक नैसर्गिक प्रोबायोटीक आणि व्हिटामीन बी-१२ नं परिपूर्ण असा पदार्थ आहे. याशिवाय व्हिटामीन बी-१२ वाढवण्यासाठी तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी, मुगाच्या डाळीच धीरडं या पदार्थांचा समावेशही करू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Eat rice this way for Vitamin B-12 boost and gut health.

Web Summary : Combat Vitamin B-12 deficiency with fermented rice kanji, a probiotic-rich vegetarian option. This traditional dish aids digestion and boosts B-12 levels naturally. Prepare with cooked rice, curd, and water, fermented overnight. Add coriander and onions for taste.
टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सअन्नपाककृतीपाककृती