Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Weight loss Tips : वाढत्या वजनाचं टेंशन घेण्यापेक्षा एक्स्ट्रा फॅट वाढूच नये म्हणून 'या' टिप्स लक्षात ठेवून फिट राहा

Weight loss Tips : वाढत्या वजनाचं टेंशन घेण्यापेक्षा एक्स्ट्रा फॅट वाढूच नये म्हणून 'या' टिप्स लक्षात ठेवून फिट राहा

How To loss weight Faster : बारीक झाल्यानंतर पुन्हा  घालता येतील असा विचार करून वर्षानुवर्ष घट्ट होणारे कपडे तसेच ठेवले जातात. हे सगळं करण्यापेक्षा शरीरावरची चरबी वाढू नये म्हणून आहार घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 04:01 PM2021-09-23T16:01:05+5:302021-09-23T16:12:58+5:30

How To loss weight Faster : बारीक झाल्यानंतर पुन्हा  घालता येतील असा विचार करून वर्षानुवर्ष घट्ट होणारे कपडे तसेच ठेवले जातात. हे सगळं करण्यापेक्षा शरीरावरची चरबी वाढू नये म्हणून आहार घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात.

How To loss weight Faster : Weight loss Tips Avoid this 10 things for avoid fat gain and weight gain | Weight loss Tips : वाढत्या वजनाचं टेंशन घेण्यापेक्षा एक्स्ट्रा फॅट वाढूच नये म्हणून 'या' टिप्स लक्षात ठेवून फिट राहा

Weight loss Tips : वाढत्या वजनाचं टेंशन घेण्यापेक्षा एक्स्ट्रा फॅट वाढूच नये म्हणून 'या' टिप्स लक्षात ठेवून फिट राहा

Highlightsफ्रेंच फ्राईजसारखे चटपटीत पदार्थ आजकाल सगळ्यांनाच आवडतात. अशा पदार्थांचे वारंवार सेवन केल्यानं मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. यात मोठ्या प्रमाणात फॅट्स असतात. जंक फूडला जंक  म्हणण्यामागे कारण असं की त्यात फक्त फॅट्स, केमिकल्स एडेटिव्ह आणि साखरेचं प्रमाण जास्त असते. यामुळे चयापचनावर परिणाम होऊन पचनक्रिया मंदावते. सतत हेच होत राहिल्यानं शरीराची चरबी वाढते.

शारीरिक हालचालींचा अभाव, बाहेरचं खाणं, पाणी कमी पिणं यामुळे  मांड्या, पोट, हातांवरची चरबी वाढत जाते. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये वजन वाढण्याची आणि अतिरिक्त फॅट्स (Fat gain) वाढण्याची शक्यता जास्त असते. कपडे घट्ट व्हायला सुरूवात झाली की वजन कमी करण्यासाठी लवकरच काही करायला हवं असं वाटतं. बारीक झाल्यानंतर पुन्हा  घालता येतील असा विचार करून वर्षानुवर्ष घट्ट होणारे कपडे तसेच ठेवले जातात.

हे सगळं करण्यापेक्षा शरीरावरची चरबी वाढू नये म्हणून आहार घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात. म्हणून  या लेखात फिगर मेंटेंन राहण्यासह (How To loss weight Faster)   चांगल्या तब्येतीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा याबाबत सांगणार आहोत.

१) मद्यपान/ धुम्रपानापासून लांब रहा

अनेक अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात ज्या आपल्या शरीरासाठी योग्य ठरत नाहीत. पॅक्ड ड्रिक्स तयार करताना साखरेचा जास्त वापर केला जातो. यामुळे चयापचन संथ गतीनं होते.  हे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत बाधा आणू शकते. म्हणून आधीच अशा पदार्थांपासून लांब राहा.

२) सोडा

पोट कमी करण्यासाठी  सगळ्यात आधी सोडायुक्त पदार्थांचे सेवन बंद करायला हवे. यात १५० एम्प्टी कॅलरीज असतात याशिवाय कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाणही जास्त असते. यातील गॅस पोट फुगण्यास, गॅसची समस्या निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतो.  महत्वाचं म्हणजे पॅक्ड सोड्याच्या  बॉटल्समध्ये न्यूट्रीशन्स आणि विटामीन्स नसतात. 

३) च्विंगम

जेव्हाही तुम्ही  च्विंगम चळगत असता तेव्हा मेंदूला विशिष्ट संकेत मिळतात.  यामुळे पोटात अतिरिक्त आम्ल तयार होते. यामुळे तुम्हाला जास्त भूक लागू शकते. क्रेविंग्समुळे गरज नसतानाही अनेकदा कॅलरीजयुक्त पदार्थ खाल्ले जातात. परिणामी वजन वाढतं. 

४)  सोडियमयुक्त पदार्थ

साखरेप्रमाणेच मीठसुद्धा आहारात जास्त प्रमाणात असू नये. यामुळे फक्त चरबी वाढणंच नाही तर  हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचाही सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार १,५०० मिलीग्राम मिठाचे सेवन  करणं योग्य ठरतं. तर काही लोक ३,४०० मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ आहारात घेतात. भविष्यातील आजारांचा धोका लक्षात घेता जेवताना वरून मीठ घेणं टाळायला हवं. 

५) फास्ट फूड

वडापाव, पिज्जा, बर्गर यांसारख्या बाहेरच्या अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात  परिणामी  आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण मिळतं. जंक फूडला जंक  म्हणण्यामागे कारण असं की त्यात फक्त फॅट्स, केमिकल्स एडेटिव्ह आणि साखरेचं प्रमाण जास्त असते. यामुळे चयापचनावर परिणाम होऊन पचनक्रिया मंदावते. सतत हेच होत राहिल्यानं शरीरातील चरबी वाढते.  म्हणून भूक लागल्यानंतर ताजी फळं, भाज्या असे हेल्दी पदार्थ खायला हवेत. 

६) मेयोनिज

 जर तुम्हालाही मेयोनिज खायला खूप आवडत असेल तर हे सुद्धा माहीत करून घ्या की त्यात ८० टक्के फॅट्स असतात. एक चमचा मायोनिजमध्ये १०० कॅलरीज असतात. मेयोनिजऐवजी तुम्ही व्हेजिटेबल प्यूरीचा वापर करू शकता. 

७) तळलेले पदार्थ

फ्रेंच फ्राईजसारखे चटपटीत पदार्थ आजकाल सगळ्यांनाच आवडतात. अशा पदार्थांचे वारंवार सेवन केल्यानं मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. यात मोठ्या प्रमाणात फॅट्स असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहत नाही. जर आपण अनावधानाने आवश्यकतेपेक्षा जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केले असेल तर काळजी करू नका. कोमट पाणी पिण्यामुळे तुमची पाचक प्रणाली शांत आणि सक्रिय होईल. गरम पाणी पिण्यामुळे पोषक द्रव्ये पचण्यास मदत होते. आपण पुरेसे पाणी न पिल्यास, लहान आतडे पाचनसाठी अन्नातून पाणी शोषून घेतात, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठता येते.

८) आईस्क्रिम

आईस्क्रिमसारखे जास्त कॅलरीजयुक्त पदार्थ वारंवार खाल्यास  पोटाची चरबी वाढण्याचा धोका असतो आईस्क्रीम खाल्ल्यानं ताणतणाव कमी होतो. पण रात्रीच्या वेळेस आईस्क्रीम खाल्ल्यास तुमच्या शरीराला अजिबात आराम मिळत नाही. आईस्क्रीममध्ये शरीराला आराम देणाऱ्या तत्त्वांचा समावेश आहे. पण सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स देखील असतात. रात्री झोपण्यापूर्वी आईस्क्रीम खाल्ल्यास फॅट्सचे पचन सहजरित्या होत नाही. यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. 

९) पोट फुगण्यासाठी कारणीभूत ठरणारे पदार्थ

दुग्धजन्य पदार्थांतून आपल्याला कॅल्शियम, मिनरल्स, प्रोटिन्स मिळतात. पण अवेळी आणि जास्त प्रमाणात या पदार्थांचे सेवन केल्यास पोट फुगणं, गॅस, अतिसार अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही ब्लोटिंगच्या समस्येनं हैराण असाल तर ताज्या फळांचे सेवन करणं त्यातल्या त्यात सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

१०) शुगर फ्री फूड

शुगर फ्री उत्पादनांमध्ये आर्टिफिशियल स्विटनर्सचा वापर केला जातो. याचा पोटाच्या आरोग्यावर परिणाम होतो. झिरो कॅलरीजचा दावा करत असलेल्या पॅकबंद उत्पादनांच्या मोहात न पडता शक्यतो नैसर्गिक अन्नपदार्थ खाणं फायदेशीर ठरेल. 

Web Title: How To loss weight Faster : Weight loss Tips Avoid this 10 things for avoid fat gain and weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.