Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > चर्चेत असलेलं, हमखास वजन कमी करणारं डाएट करता, सतत डाएट बदलता? पस्तावाल, हे वाचा..

चर्चेत असलेलं, हमखास वजन कमी करणारं डाएट करता, सतत डाएट बदलता? पस्तावाल, हे वाचा..

जगभरातल्या डाएट ट्रेण्डचा अभ्यास करणारे तज्ज्ञ डाएट फॅडच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत. वजन कमी करण्यासाठी डाएट फॅडचा हात धरणाऱ्यांनी तर या गोष्टी वाचायलाच हव्यात अशा आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 05:56 PM2021-03-31T17:56:55+5:302021-04-01T12:39:52+5:30

जगभरातल्या डाएट ट्रेण्डचा अभ्यास करणारे तज्ज्ञ डाएट फॅडच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत. वजन कमी करण्यासाठी डाएट फॅडचा हात धरणाऱ्यांनी तर या गोष्टी वाचायलाच हव्यात अशा आहेत.

Do you really lose weight by following a certain diet? What do experts say about this fad diet? | चर्चेत असलेलं, हमखास वजन कमी करणारं डाएट करता, सतत डाएट बदलता? पस्तावाल, हे वाचा..

चर्चेत असलेलं, हमखास वजन कमी करणारं डाएट करता, सतत डाएट बदलता? पस्तावाल, हे वाचा..

Highlightsएका डाएटवरुन दूसऱ्या डाएटवर शिफ्ट होत राहिल्याने वजन तर कमी होत नाहीच उलट आरोग्याचे ,पचनाचे इतर विकार डोकं वर काढतात.वजन कमी करण्यासाठी अमूक एक पोषक तत्त्वच महत्त्वाचं असंही अनेक डाएट फॅड सांगतात. पण तज्ज्ञ हा दावा खोडून काढताना म्हणतात की शरीरासाठी प्रत्येक पोषक तत्त्वं सारखंच महत्त्वाचं असतं.अनेक डाएटमूळे कमी वेळात जास्त वजन कमी होतं हे सत्य आहे. पण कमी झालेलं वजन टिकून राहात नाही हेही सत्य आहे.

वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करणं हा अनेकींना सोपा उपाय वाटतो. पण असं असलं तरी डाएट फॉलो करणारे एकाच डाएटवर टिकून राहातात असं नाही. कारण एखादं डाएट फॉलो करायला लागल्यावर दिसणारे परिणाम हे तात्कालिक असतात. पूढे अपेक्षित वजन कमी होतच नाहीये म्हटल्यावर मग दूस-या डाएटचा शोध घेतला जातो. एका डाएटवरुन दूस-या डाएटवर शिफ्ट होत राहिल्याने वजन तर कमी होत नाहीच उलट आरोग्याचे ,पचनाचे इतर विकार डोकं वर काढतात. जगभरातल्या डाएट ट्रेण्डचा अभ्यास करणारे तज्ज्ञ डाएट फॅडच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत. वजन कमी करण्यासाठी डाएट फॅडचा हात धरणा-यांनी तर या गोष्टी वाचायलाच हव्यात अशा आहेत.

  कोणतंच डाएट हे एकमेव किंवा स्पेशल असत नाही.

प्रत्येक डाएट फॅड हे आपण स्पेशल असल्याचा दावा करतात. पण तज्ज्ञ सांगतात की कोणतंही नवीन डाएट हे अस्तित्त्वात असलेल्या डाएटची मोड तोड करुन तयार केलेलं असतं. अमूक एक डाएट केवळ प्रोटिन्सवर भर देणारं असतं, तर काही डाएट हे लो कार्ब डाएट असतात. काही डाएट हे फायबर ला महत्त्व देणारे असतात. अमूक एका गोष्टींवर भर देणारे डाएट आपण स्पेशल असल्याचा दावा करतात. ते डाएट फॉलो करणारे आपली पूर्वीची खाण्यापिण्याची सवय बदलून नवीन डाएट फॉलो करतात. तेव्हा नव्यानं बदल झाल्यानं शरीरातही बदल झाल्यासारखा वाटतो. पण हा बदल तात्कालिक असतो. कारण एकच एक घटक सतत आहारात असल्याने त्याचाही कंटाळा येतो. ती आपल्या रोजच्या खाण्याची सवय बनू शकत नाही. आम्हीच स्पेशल असा दावा करणा-या आणि आहारातल्या एकच एक घटकाच्या मागे लागलेल्या डाएट फॅडच्या या मर्यादा आहेत.

सर्व पोषक घटक सारखेच महत्त्वाचे असतात.

वजन कमी करण्यासाठी अमूक एक पोषक तत्त्वच महत्त्वाचं असंही अनेक डाएट फॅड सांगतात. पण तज्ज्ञ हा दावा खोडून काढताना म्हणतात की शरीरासाठी प्रत्येक पोषक तत्त्वं सारखंच महत्त्वाचं असतं. आपल्या शरीराच्या पोषणासाठी एकच एक पोषक घटक पूरेसा ठरत नाही. शरीराला वेगवेगळ्या पोषक घटकांची आवश्यकता असते. कर्बोदकं, प्रोटिन्स, फायबर आणि फॅटस हे घटक शरीरासाठी सारखेच महत्त्वाचे असतात प्रोटिन्सपेक्षा कर्बोदकं महत्त्वाची असं म्ह्णून चालत नाही. कर्बोदकाचं रुपांतर ग्लूकोजमधे होतं तेव्हाच शरीराला ऊर्जा मिळते. फायबरमूळे पचनसंस्थेचं कार्य व्यवस्थित घड्तं आपल्या स्नायूंसाठी प्रोटिन्स महत्त्वाची असतात. तर फॅटस हे अवयवांचं रक्षण करण्यासाठी आणि पोषक घटक शोषून घेण्यासाठी गरजेचे असतात. हे सर्व घटक शरीरात एकाचवेळी सारखेच महत्त्वाचे असतात. त्यामूळे लो कार्ब डाएट, हाय प्रोटीन डाएट यामूळे पोषक घटकांचा असमतोल निर्माण होतो. आणि वजन कमी होणं दूरची गोष्ट पण आरोग्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होतात.

 फॅड डाएट मागची जाहिरात ओळखायला शिकायला हवं

 अनेक डाएट स्वत:चं उत्पादन विकत असतात. प्रोटिन शेक किंवा पावडरच्या स्वरुपात ते डाएट आडून स्वत:च्या उत्पादनांची विक्री करुन पैसे कमवत असतात. शेक , पावडर या स्वरुपातलं डाएट हे अतिप्रक्रिया करुन तयार झालेलं आणि एकच एक घटकाचा समावेश असलेलं असतं. शिवाय या अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांमधे अ‍ॅलर्जी करणार सॉय हे घटक असल्याचं तज्ञ्ज्ञांना आढळून आलेलं आहे . शिवाय शेक आणि पावडरमधे घातलेले स्वीटनर्स हे पचनसंस्थेचं कार्य बिघडवत असल्याचंही सिध्द झालेलं आहे. अशा प्रकारचं डाएट शरीराला आरोग्यदायी ठरणारं ताजं शिजवून खाण्याच्या सवयीला खो घालतात. म्हणूनच अशा प्रकारच्या डाएटचे लवकर रिझल्ट दिसत असले तरी ते कायमस्वरुपी नसतात. तात्कालिक ठरतात.

परिणाम दिसतात पण टिकतात कूठे?

अनेक डाएटमूळे कमी वेळात जास्त वजन कमी होतं हे सत्य आहे. पण कमी झालेलं वजन टिकून राहात नाही हेही सत्य आहे. कारण ज्या उत्साहानं हे डाएट फॉलो केले जातात नंतर नंतर ते रटाळ वाटतात. नकोशी वाटतात. थोडंच खायचं या भावनेनं हे डाएट अनफॉलो करण्याचा ट्रेण्ड वाढतो आहे. त्यामूळे परिणाम दिसत असले तरी डाएटमधील तोचतोचपणा डाएटची शिसारी आणतो.

वजन कमी करण्यासाठी डाएटच्या मोहात पडण्याआधी या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे.

Web Title: Do you really lose weight by following a certain diet? What do experts say about this fad diet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.