lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > जेवताना रोज १ चमचा ही चटणी खा; महिलांच्या बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय-हाडं होतील मजबूत

जेवताना रोज १ चमचा ही चटणी खा; महिलांच्या बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय-हाडं होतील मजबूत

Chutney For Healthy Bones ( Chutney Kashi Kartat) : शेंगदाणे आणि तिळाच्या सेवनाने शरीराला भरपूर फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:01 PM2024-05-08T12:01:54+5:302024-05-09T18:22:52+5:30

Chutney For Healthy Bones ( Chutney Kashi Kartat) : शेंगदाणे आणि तिळाच्या सेवनाने शरीराला भरपूर फायदे मिळतात.

Chutney For Healthy Bones : Eat These Chutney With Lunch For Good Health | जेवताना रोज १ चमचा ही चटणी खा; महिलांच्या बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय-हाडं होतील मजबूत

जेवताना रोज १ चमचा ही चटणी खा; महिलांच्या बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय-हाडं होतील मजबूत

दुपारी आणि रात्रीच्या खाण्यात तेच तेच जेवण करायचं म्हटलं की नको वाटतं. (Health Tips) कारण नेहमीच चांगलं काहीतरी खाण्याची इच्छा होत असते. अशावेळी चमचाभर चटणीचा आहारात समावेश करून तुम्ही पोटभर जेवू शकता. चटणी खाल्ल्याने फक्त तुमचं पोट भरणार नाही तर तब्येतही चांगली राहण्यास मदत होईल. साधी चटणी न बनवता तुम्ही यात काही पदार्थ घातले तर चव अधिकच वाढेल आणि पौष्टीकही बनेल. चटणीतून पोषण आणि चव  दोन्ही मिळवता येते. (Eat These Chutney With Lunch For Good Health)

कारळ्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

कारळ्याची चटणी करण्यासाठी वाटीभर कारळं घ्या कोणत्याही  किराणी दुकानात तुम्हाला हे उपलब्ध होईल, २५ ते ३० ग्राम पांढरे तिळ घ्या. यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, पाव वाटी शेंगदाणे घ्या, साधारण २० ते  २५ लसणाच्या सोललेल्या पाकळ्या घ्या, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, लाल तिखट अर्धा टिस्पून, जीरं  २ ते ३ चमचे. 

कारळ्याची चटणी कशी करायची?

१) सगळ्यात आधी कढई गरम करून घ्या. त्यात कारळं भाजून घ्या, त्यानंतर शेंगदाणे आणि तीळही भाजून घ्या.

२) भाजलेले पदार्थ एका  वाटीत काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात ते साहित्य घाला. त्यात सोललेले लसूण घालून बारीक करून घ्या. हे वाटलेलं मिश्रण एका वाटीत काढा.

३) चटणी थोडी जाडसर ठेवा कारण जास्त बारीक केल्यामुळे चटणीला तेल सुटेल आणि चवीवरही परिणाम होऊ शकतो.

४) घरात भाजीला काहीही नसेल तर तुम्ही या चटणीचे सेवन करू शकता. ही चटणी चवीला उत्तम लागते. कारल्याच्या चटणीत तुम्ही आवडीनुसार सुकं खोबरं किंवा आलं घालू शकता. 

हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल

जेवताना ही चटणी खाण्याचे फायदे

शेंगदाणे आणि तिळाच्या सेवनाने शरीराला भरपूर फायदे मिळतात. यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे हाडांना बळकटी येते, सांधेदुखीचा त्रासही कमी होईल. याशिवाय हाडं मजबूत होतील. प्रोटीन्सही मिळतात.  जेवताना ही चटणी खाल्ल्याने महिलांचा अनेक आजारांपासून बचाव होईल. थकवा, अशक्तपणाही जाणवत नाही.

Web Title: Chutney For Healthy Bones : Eat These Chutney With Lunch For Good Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.