lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बारीक व्हायचंय पण डाएट नको वाटतं? जेवणात 'ही' डाळ खा; भराभर घटेल पोटाची चरबी-स्लिम दिसाल

बारीक व्हायचंय पण डाएट नको वाटतं? जेवणात 'ही' डाळ खा; भराभर घटेल पोटाची चरबी-स्लिम दिसाल

Belly Fat Loss Food : मूग डाळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 04:10 PM2023-12-03T16:10:46+5:302023-12-04T09:13:30+5:30

Belly Fat Loss Food : मूग डाळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Belly Fat Loss Food : Five Ways To Eat Moong Dal For weight Loss Food For weight Loss | बारीक व्हायचंय पण डाएट नको वाटतं? जेवणात 'ही' डाळ खा; भराभर घटेल पोटाची चरबी-स्लिम दिसाल

बारीक व्हायचंय पण डाएट नको वाटतं? जेवणात 'ही' डाळ खा; भराभर घटेल पोटाची चरबी-स्लिम दिसाल

वजन कमी करण्यासाठी लोक धावणं, सायकलिंग, डाएट,डिटॉक्स ड्रिंक्सपासून सर्वकाही करतात. तर काहीजण जीममध्ये तासनतास घाम गाळतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कोणतंच अवघड डाएट फॉलो करण्याची गरज नाही तुम्ही घरी बनवलेलं साधं जेवण खाऊनही वजनावर नियंत्रण ठेवू शकता. असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.  (Fitness Tips Five Ways To Eat Moong Dal For weight Loss)

या लिस्टमध्ये सगळ्यात वर आहे ती म्हणजे मूग डाळ (Moong Dal), मूग डाळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मांसपेशींच्या विकासासाठी तसंच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण यात फायबर्स असतात. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि वजनही वाढत नाही. तुम्ही आपल्या रोजच्या जेवणात याचा  समावेश करायला हवा.(Moong dal promotes weight loss)

मूग डाळ चिला

वजन कमी करण्यासाठी मूगाच्या डाळीचा चिला एक हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्ट ऑपश्न आहे.  हा चिला बनवण्यासाठी सगळ्यात आधी मूग डाळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर वाटून घ्या. त्यात चिरलेले कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, मसाले, मीठ घालून एकजीव करा. गरजेनुसार पाणी घालून डोश्या प्रमाणे बॅटर तयार करा.  या डोश्यामुळे दीर्घकाळ तुमचं पोट भरलेलं राहील आणि ओव्हर इटिंगही करणार नाही.

मूग डाळ खिचडी

वजन कमी करण्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी हा उत्तम पर्याय आहे. रोजच्या जेवणात या खिचडीचा समावेश केल्यास तुम्हाला पुरेपूर पोषण मिळेल.  वजनही कंट्रोलमध्ये राहील. यासाठी पिवळी मूगाची डाळ आणि तांदूळाची आवश्यकता असेल. तुम्ही यात आपल्या आवडीच्या हिरव्या भाज्यासुदधा घालू शकता.  यावर तूप घालून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी खा.

कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी

मूग कडधान्य

वजन कमी करण्यासाठी मूंग डाळ स्प्राऊट्सचे सेवनही फायदेशीर ठरते. रोज रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. वजन कमी होण्यासही मदत होते. मोड आलेल्या मुगात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लिंबाचा रस घालून एक मिश्रण तयार करा हे स्वादीष्ट आणि प्रोटीन्सनी परिपूण असेल.

मूग डाळीचे सूप

जर तुम्ही वाढलेलं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर मूग डाळीचे सेवन उत्तम पर्याय आहे. हे सूप स्वादीष्ट असण्याबरोबच बनवायलाही सोपं असते.  शिजवलेली मुगाची डाळ घोटून त्यात आलं, जीरं,  मसाले, हिंग, मीठ घालून उकळून घ्या नंतर एका बाऊलमध्ये काढून त्यात काळी मिरी घालून याचे सेवन करा. नियमित याचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

विरजण नसेल दही कसं लावायचं? ५ ट्रिक्स वापरा, विकतसारखं घट्ट-मलईदार दही पटकन बनेल घरी

मूग डाळ इडली

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही मूगाच्या डाळीची इडलीसु्दधा खाऊ शकता. भिजवलेली मुगाची डाळ वाटून त्यात आपल्या आवडीच्या भाज्या, मसाला आणि मीठ घाला. नंतर या बॅटरच्या इडल्या बनवून घ्या. सकाळी नाश्त्याला तुम्ही मूंग डाळीची इडली खाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला सतत भूक लागणार नाही आणि वजन कमी होण्यासही मदत होईल.

Web Title: Belly Fat Loss Food : Five Ways To Eat Moong Dal For weight Loss Food For weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.