Lokmat Sakhi >Food > कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी

कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी

No Sugar Dry Fruit and Coconut Ladoo : हे लाडू फक्त चवीला चांगले नसतात तर यामुळे शरीराला पुरेपूर पोषण मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:10 AM2023-12-03T10:10:18+5:302023-12-03T10:29:49+5:30

No Sugar Dry Fruit and Coconut Ladoo : हे लाडू फक्त चवीला चांगले नसतात तर यामुळे शरीराला पुरेपूर पोषण मिळते.

No Sugar Dry Fruit Coconut Ladoo : Easy Dry Fruits Laddu Recipe No sugar dry fruit and coconut ladoo with jaggery | कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी

कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी

थंडीच्या (Winter) दिवसात शरीराला उर्जा मिळण्यासाठी आणि शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी गरम पदार्थ खाण्याची आवश्यकता असते. (No Sugar Dry Fruit and Coconut Ladoo) आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही हिवाळ्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींना लांब ठेवू शकता. (Dry Fruit Laddu)

या दिवसांत अनेक घरांमध्ये डिंकाचे, मेथीचे, अळिवाचे लाडू बनवले जातात. हे लाडू फक्त चवीला चांगले नसतात तर यामुळे शरीराला पुरेपूर पोषण मिळते याशिवाय सांधेदूखी, गुडघेदूखीचा त्रासही टळतो. नारळ ड्रायफ्रुट्सचा लाडू करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Nariyal Dry Fruit Laddu)

नारळ-ड्रायफ्रुट्सचे लाडू करण्याची सोपी रेसिपी (Naral Dryfruits che ladoo kase karayche)

१) सगळ्यात आधी ओलं नारळ फोडून त्यातील पांढरा भाग बाहेर काढून घ्या.  पांढरा भाग बारीक किसून घ्या.  कढईत तूप घालून त्यात बदामाचे काप तळून घ्या. त्यानंतर अक्रोड आणि बदामसुद्धा तळून घ्या. 

२) बदाम, काजू आणि अक्रोड लालसर झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या.  नंतर पुन्हा तूप घालून शेंगदाणे आणि मनुके भाजून घ्या. त्यातच ओल्या खोबऱ्याचा किस परतवून  घ्या.

बटाट्याच्या सालीचे कुरकुरीत चिप्स घरीच करा; सोपी पद्धत, एकदा खाल तर खातच राहाल

३) मिक्सरच्या भांड्यात ड्रायफ्रुट्सचे काप घालून जाडसर वाटून घ्या.  कढईत गूळ आणि पाणी घालून पाक तयार करून घ्या. त्यात नारळाचा किस, खारीकाची पावडर, ड्रायफ्रुट्सची जाडसर पावडर घालून मिश्रण तयार करून घ्या. 

४) त्यात वेलची पावडर घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर गॅस बंद करून तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या. 

१) हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर - नारळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांसारखे आवश्यक तत्व असतात. हे बोन्स हेल्थसाठी फायदेशीर ठरतात. नारळाच्या लाडूचे सेवन केल्यास हाडं चांगली मजबूत राहण्यास मदत होते. याशिवाय ऑस्टिओपोरोसिस  यांसारखे आजारही दूर होतात.

२) इम्यूनिटी चांगली राहते- एक्सपर्ट्सच्यामते नारळात बॅक्टेरियाजपासून बचाव करणारे लॉरिक एसिड असते.  याच्या सेवनाने इम्यूनिटी मजबूत होतो. नारळाचे लाडू खाल्ल्याने इन्फेक्शनपासून बचाव  होतो आणि गंभीर आजार उद्भवत नाहीत.

प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

३) नारळाचे लाडू- नारळाच्या लाडूचे सेवन केल्याने तब्येत चांगली राहण्यास मदत होते. यात हेल्दी घटक असतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. यातील फायबर्समुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. ज्यामुळे सतत भूक लागत नाही. वजन नियंत्रणात राहतं.  

Web Title: No Sugar Dry Fruit Coconut Ladoo : Easy Dry Fruits Laddu Recipe No sugar dry fruit and coconut ladoo with jaggery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.