lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट सुटलं- वाढलेल्या घेरामुळे कंबरही जाड दिसते? १ ग्लास पाण्यातून ‘हा’ पदार्थ प्या, झटपट चरबी गायब

पोट सुटलं- वाढलेल्या घेरामुळे कंबरही जाड दिसते? १ ग्लास पाण्यातून ‘हा’ पदार्थ प्या, झटपट चरबी गायब

Amla For Weight Loss : मॉर्निंग रूटीनमध्ये छोटा बदल करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 10:28 AM2024-05-07T10:28:22+5:302024-05-07T19:26:21+5:30

Amla For Weight Loss : मॉर्निंग रूटीनमध्ये छोटा बदल करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

Amla For Weight Loss : According To Research Amla Water Is Best For Weight Loss Researchers says | पोट सुटलं- वाढलेल्या घेरामुळे कंबरही जाड दिसते? १ ग्लास पाण्यातून ‘हा’ पदार्थ प्या, झटपट चरबी गायब

पोट सुटलं- वाढलेल्या घेरामुळे कंबरही जाड दिसते? १ ग्लास पाण्यातून ‘हा’ पदार्थ प्या, झटपट चरबी गायब

सतत गोड खाऊन, एकाच जागी तासनतास बसून पोटावरची चरबी वाढली आहे अशी तक्रार अनेकांची असते. (Weight Loss Tips) पोटाची चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय  करतात पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. तर काही जणांना  जीम, योगा यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी मॉर्निंग रूटीनमध्ये छोटा बदल करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. (According To Research Amla Water Is Best For Weight Loss Researchers says)

आवळा खाल्ल्याने बेली फॅट कमी होण्यास मदत होते. यात फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे बराचवेळ भूकही लागत नाही. यातील कॅलरी इन्टेक कमी असते हार्वर्डच्या रिपोर्टनुसार वजन कमी करण्यासाठी फायबर्स खूप महत्वाचे असतात. डायजेशन सुधारून फॅट बर्निंग होण्यास मदत होते. 

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडीसिनच्या रिपोर्टनुसार आवळ्याच्या सेवनानं लो डेंसिनटी लिपोप्रोटन कोलेस्टेरॉल  आणि हाय डेंसिटी लिपोप्रोटीन यांचा समतोल साधला जातो होते.  यामुळे शरीर निरोगी राहते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. उंदरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातही आवळ्याच्या सेवनाने फॅट्सच्या स्टोरेजवर परिणाम होत असल्याचे दिसून आले.

आवळ्याचा ज्यूस

आवळ्याचा ज्यूस चवीला आंबट असतो म्हणून यातून शरीराला फायबर्स पुरेश्या प्रमाणात मिळत नाहीत. आवळ्याचा चहा पिणं तब्येतीसाठी अधिकच फायदेशीर मानलं जातं.  सगळ्यात आधी एका भांड्यात ४ कप पाणी घ्या. त्यात १ चमचा आवळा पावडर, १ चमचा सुंठ घालून उकळून घ्या. जेव्हा हे पाणी १ कप राहील तेव्हा त्यात १ ग्लास  ड्रिंकमध्ये हलकं काळं मीठ, मध मिसळून पिऊन घ्या. डायबिटीक पेंशट्सनी यातील मध घालणं टाळायला हवं.

आवळ्यात क्रोमियम असते. यात फळात अशी तत्व असतात जे खाल्ल्यानंतर शुगर लेव्हल वाढणं रोखता येतं. डायबिटीस अससल्यास या फळाचे सेवन फायदेशीर मानले जाते.  आवळ्यात क्रोमियम असते. यातील तत्व ब्लड शुगल वाढण्यापासून रोखतात आणि डायबिटीसचा धोकाही उद्भवत नाही.

चेहऱ्यावर  ग्लो येतो

आवळा व्हिटामीन सी चा भंडार आहे. यात एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे स्किन ग्लो होण्यास मदत होते. केसांना चमक येते आणि ब्लड फ्लो वाढून चेहऱ्याची चमक सुधारण्यासही मदत होते. आवळा खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते आणि एंटी ऑक्सिडेंट्स इम्यून सिस्टिममला  ताकद देतात जेणेकरून इन्फेक्शनपासून बचाव होईल. अनेक संशोधनातून असं दिसून आले की आवळ्यामुळे लिव्हरचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

Web Title: Amla For Weight Loss : According To Research Amla Water Is Best For Weight Loss Researchers says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.