Join us  

बदामापेक्षा चारपट जास्त प्रोटीन देतात ५ बिया; खर्च फक्त १० रूपये-भरपूर प्रोटीन मिळेल, हाडांना येईल ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 5:40 PM

5 Type Of Protein Rich Seeds In Your Diet Gain : आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांच्यामते प्रोटीन्स, अमिनो एसिड्स, फायबर्स, व्हिटामीन्स, मिनरल्सचा उत्तम स्त्रोत आहे

प्रोटीन शरीरातील महत्वपूर्ण पोषक घटकांपैकी एक आहे. (Protein Foods) शरीराच्या वेगवेगळ्या कार्यांसाठी प्रोटीन्स वापरले  जातात. शरीरात उर्जेचा स्तर चांगला ठेवण्यासाठी, मांसपेशींच्या विकासासाठी प्रोटीन आवश्यक असते. (Health Tips For Protein) यातून काही हॉर्मोन्स, इंसुलिन आणि थारोक्सिनचे निर्माण होते. ज्यामुळे प्रोटीन संरचनात्मक कार्य आणि मांसपेशींच्या विकासासाठी महत्वाचे असते. (Weight Loss Tips) लोकांना असं वाटतं की मांस, दूध, अंडी यात सर्वात जास्त प्रोटीन असते. (These 5 Type Of Protein Rich Seeds In Your Diet Gain)

या पदार्थांचे सेवन न केल्यास तुम्हाला योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळत नाहीत असा तुमचाही समज असेल तर हा गैरसमज आधी दूर करायला हवा. (High In Protein) योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचा आहारात समावेश करू शकता. (Foods For High Protein Meals)

आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांच्यामते प्रोटीन्स, अमिनो एसिड्स, फायबर्स, व्हिटामीन्स, मिनरल्सचा उत्तम स्त्रोत आहे. आळशी, भोपळ्याच्या बिया यातून मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. (Protein Rich Seeds In Your Diet Gain Weight And Make Your Muscles Strong)

१) आळशीच्या बीया

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार आळशीच्या बीयांमध्ये १५२ कॅलरीज असतात. ७.८ ग्रॅम फायबर्स असतात, ५.२ ग्रॅम प्रोटीन्स असतात. आळशीच्या बियांमध्ये प्रोटीन्सबरोबरच ओमेगा-३ फॅटी एसिड्स आणि फायबर्स  मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. वजन कमी करण्यासही मदत होते. ज्यामुळे शरीराचे कार्यही चांगले राहते.

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिवळे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

२) चिया सिड्स

चिया सिड्समध्ये प्रोटीन्स, फायबर्स आणि अल्फा लिनोलेनिक एसिड असते. ज्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहते आणि हृदयाचे आरोग्यही सुधारते. तुम्ही हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी या बियांचा आपल्या आहारात समावेश करू शकता. 

३) सुर्यफुलाच्या बिया

सुर्यफुलांच्या बियांमध्ये प्रोटीन्स, व्हिटामीन ई, मॅग्नेशियम आणि सेलेमियन मोठ्या प्रमाणात असते. जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. शारीरिक कमकुवतपणा, थकवा दूर करण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता. 

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

४) तिळाच्या बिया

तिळात प्रोटीन्स, कॅल्शियम आणि आयर्न अशी पोषक तत्व असतात. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. शरीरातील उर्जेचा स्तर वाढवण्यास मदत होते. याशिवाय शरीरात आवश्यक न्युरोट्रांसमिटरर्सचे उत्पादन होते. 

५) भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहेत. यात जिंक, मॅग्नेशियम असते ज्यामुळे हाडं मजबूत राहण्यास मदत  होते. शरीरातील उर्जेचे स्तर वाढतो आणि मनोवैज्ञानिक स्थितीत संतुलन राहण्यास मदत होते. तुम्ही जेवणात किंवा नाश्त्याला किंवा या बियांचे सेवन करू शकता. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य