lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

How Many Steps Per Day to Lose Weight : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते रोज १० हजार पाऊलं चालल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 04:03 PM2024-02-25T16:03:08+5:302024-02-25T16:05:47+5:30

How Many Steps Per Day to Lose Weight : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते रोज १० हजार पाऊलं चालल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल

How Many Steps Per Day to Lose Weight : How Many Steps Should Peaple Take Per Day | रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

तुम्ही कितीही लठ्ठ असाल तरीही रोज व्यायाम केल्याने आणि पायी चालल्याने तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. फक्त कितीवेळ चालायचं आणि चालण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. (How Many Steps Should Peaple Take Per Day) जर तुम्ही आपल्या हातावर स्मार्ट वॉच बांधत असाल तर रोज १० हजार पाऊलं चालण्याचं टार्गेट सेट करायला हवं. (Walking For Weight Loss) हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते रोज १० हजार पाऊलं चालल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. (How Many Steps Per Day to Lose Weight)

अमेरिकन काऊंसिल ऑफ एक्सरसाईजच्या रिपोर्टनुसार रोज  २५०० पाऊलं चालल्याने तुमची तब्येत चांगली राहू शकते.  रोज कमीत कमी  १० हजार पाऊल चालल्याने आरोग्याच्या समस्याही उद्भवत नाहीत. आरोग्यतज्ज्ञ नेहमी ५ हजार पाऊल चालण्याचा सल्ला  देतात.

वयानुसार रोज किती चालायला हवं?(Walking For Weight Loss)

एका अभ्यासानुसार ४० वर्ष वयोगटापेक्षा मोठ्या असलेल्यांनी १० हजार पाऊलं चालायला हवं. अनेकदा शारीरिक बदलांमुळे लठ्ठपणा वाढतो.  ४० वर्ष वयोगटातील महिलांना रोज १२ हजार पाऊल चालायला हवं. ४० ते ४५ वर्षवयोगटातील महिलाने रोज १२  हजार पाऊलं चालायला हवं.  ३० ते ४० वर्ष वयोगटातील महिलांनीही १२ हजार पाऊलं चालायला हवं. ४० ते ५० वर्ष वयोगटातील लोकांनी ११ हजार पाऊलं चालायला हवे.

५० ते ६०  वर्षांच्या  महिलांना १० हजार पाऊलं चालायला हवं. ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी ८ हजार पाऊलं चालावे,  १८ ते ५० वर्षांच्या लोकांनी रोज १० ते १२ हजार पाऊलं चालावे. ५० ते ६० वर्ष वयोगटातील लोकांनी १० ते ११  हजार पाऊल रोज चालायला हवे.  लहान मुलांनी चालण्याऐवजी  काही सोप्या  खेळांचा आपल्या दीनचर्येत समावेश करावा.

आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत यशस्वी होतील मुलं; लहानपणापासूनच 'या' १० सवयी लावा-यशाचं सोपं सिकेट

एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. संजय कालरा यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना सांगितले की, रोज कमीत कमी  १० हजार पाऊलं चालायला हवं. लाईफस्टाईल संबंधित समस्या जसं की डायबिटी,  हार्ट डिसीज, स्ट्रोक, डिप्रेशन, कॅन्सरपासूनही बचाव होतो. रिसर्चनुसार रोज ४ ते ५ हजार पाऊलं चालल्याने  शरीर निरोगी राहते पण रोज १० हजार पाऊल चालण्यात  काहीही नुकसान नाही. 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी चालण्याचा नियम काय आहे?

डॉक्टर सांगतात की कोणत्याही व्यक्तीचं वजन जास्त असेल आणि त्याला वजन कमी करायचं असेल तर चालताना स्टेप्सची संख्या वाढवायला हवी. याशिवाय शरीराच्या काही भागात जमा झालेल्या चरबीनुसार व्यायामही करायला हवेत. डायबिटीस किंवा ब्लड शुगरचा त्रास असेल तर  रोज १२ हजार पाऊलं चालायला हवं.

Web Title: How Many Steps Per Day to Lose Weight : How Many Steps Should Peaple Take Per Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.